केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. शुक्रवारी ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला होता. सध्या या चित्रपटाला स्त्रियांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

केदार शिंदे हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची लेखिका वैशाली नाईकचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : Baipan Bhari Deva Collection: ‘बाईपण भारी देवा!’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या आठवड्यात कमावले इतके कोटी

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
nikhil rajeshirke wedding ritual begins
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा

केदार शिदेंची पोस्ट

“हे जे छोटंसं बाळ दिसतय, ते छोटा पॅकेट बडा धमाका आहे. वैशाली नाईक 2018 मध्ये एका हिंदी शो च्या award function मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. ही हिंदी टेलिव्हिजन शो ची उत्तम लेखिका आहे. मला येऊन म्हणाली की, माझ्याकडे एक सिनेमाचं कथानक आहे. मी म्हटलं की, हिंदी सिनेमा मी करत नाही. म्हणाली, कथा मराठी सिनेमासाठी आहे. तेव्हा समजलं की, ही हिंदी भाषिक नसून नाईकांची वैशाली आहे.

दुसऱ्या दिवशी भेटलो आणि तीने मला ६ बहिणीची गोष्ट ऐकवली. ऐकताच मी प्रेमात पडलो. तिथेच ती मला रीलेट झाली. खरतर मला सख्खी बहिण नाही. पण कुठेतरी ते कॅरेक्टर्स मला माझ्या मावशी, आत्या, आई, आजी सारखे वाटले. मग तो लिखाणाचा उत्तम प्रोसेस. नवीन नवीन सुचवून मी कंटाळलो नाही आणि लिहून लिहून ती नाही. तीचा पहिल्या सिनेमात तीने जी कामगिरी केली ती थक्क करणारी आहे.

बाईपणभारीदेवा तीच्यासाठी जन्म आहे. मला ठाऊक आहे की हे बाळ खुप मोठं होणार आहे. कारण या बाळाचे पाय पाळण्यात दिसले आहेत. गेली ३ वर्षे जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी थांबला तेव्हा तीची घालमेल मला जाणवत होती. उगाचच मला गिल्टी वाटायचं. पण वैशाली मी म्हणालो होतो, सिनेमा येणार आणि तो चिरकाल स्मरणात राहणार. मी माझा शब्द पुर्ण केला. जसा तू माझ्यासाठी शब्द शब्द लिहिलास!!! आता जबाबदारी वाढली आहे. लवकरच भेटू”, असे केदार शिदें यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने मोडला बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, कमाई पाहून केदार शिंदे म्हणाले, “तब्बल २१ वर्ष…”

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

दरम्यान या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. यानंतर आता चार दिवसात या चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ झाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात हा चित्रपट १५ कोटींचा टप्पा पार करेल, असंही बोललं जात आहे.