‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आता या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अभिनेत्री-लेखिका शिल्पा नवलकर यांच्याबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी दोन दिवसांवर आली आहे. अशातच केदार शिंदे यांनी शिल्पा नवलकर यांच्यासाठी एक पोस्ट शेअर करत त्यांचं भरभरून कौतुक केलं. तर केदार शिंदे यांची ही पोस्ट आता खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “मी त्याच्या जीवावर पोट भरलं आहे…,” केदार शिंदेंची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ अभिनेत्यासाठी खास पोस्ट

केदार शिंदे यांनी त्यांचा शिल्पा नवलकर यांच्याबरोबर काढलेला एक फोटो शेअर करत लिहिलं, “शिल्पा आणि मी पहिल्यांदा एकत्र काम केलं ते “अजुनही चांदरात आहे” या मालिकेत ती अभिनेत्री म्हणून सुरूवात करून कधी लेखक म्हणून स्थिरावली हे तीचं तीलाही समजत नसावं. माझ्या सोबतचा तिचा संबंध हा टॉम अँड जेरीसारखाच. ती किती कुसक्यासारखी माझ्यासोबत वागते हे मला, सुकन्या मोने आणि सुचित्रा बांदेकर यांनाच माहित आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमात ती केतकीच्या भूमिकेत दिसणार आहे. केतकीचे प्रॉब्लेम वेगळे असले तरी “तोरा” अगदिच शिल्पा सारखा आहे. आज शिल्पा टीव्ही दुनियेतील टॉपची लेखक आहे. नंबर वन सिरीयल “ठरलं तर मग” ह्याच्या लेखनात प्रचंड व्यस्त आहे.. पण सिनेमातली तिची भुमिका पाहून तुम्ही थक्क नक्कीच व्हाल! माझ्यामते तिने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मला आशा आहे की, तिचा माझ्याविषयीचा प्रेमातून येणारा तुच्छपणा असाच अबाधित राहील आणि आम्ही आयुष्यभर असेच प्रेमात राहू.”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून लोकप्रिय मराठी स्टारकिड करणार मनोरंजनसृष्टीत पदार्पण, तुम्ही तिला ओळखलं का?

आता केदार शिंदे यांची ही पोस्ट चांगली चर्चेत आली असून त्यांचे चाहते त्यावर कमेंट करत त्यांच्या या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत. त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

Story img Loader