मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा ‘डॅम ईट आणि बरंच काही’ या पुस्तकातून सांगितली गेली आहे. गेली अनेक दशकं ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आले आहेत. या पुस्तक प्रकाशनानंतर त्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या ज्यात त्यांनी बायोपिकबद्दल भाष्य केलं आहे.
हिंदीप्रमाणे मराठीतदेखील बायोपिक चित्रपटांची लाट आली आहे. मराठीत ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘एक अलबेला’, ‘धर्मवीर’ असे बायोपिक येऊन गेले आहेत. महेश कोठारे त्यांच्या जीवनावर बायोपिक आला तर कोणता अभिनेता ही भूमिका साकारेल हे सांगितले आहे. लोकमत फिल्मी ते बोलताना असं म्हणाले की, “माझ्यावर बायोपिक आला तर आदिनाथ कोठारे माझी भूमिका साकारू शकतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
‘बिग बॉस’ नंतर अपूर्वा नेमळेकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
‘डॅम इट आणि बरंच काही’च्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले, “माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. या पुस्तकाद्वारे मी माझं संपूर्ण जीवन सर्वांसमोर आणलं आहे. यात माझ्या जीवनातील चढ-उतार आणि संघर्ष आहे. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण जर्नी आहे. कुठल्याही तरुण-तरुणींना कोणत्याही क्षेत्रांत जर यश मिळवायचं असेल, तर त्याला या पुस्तकातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल.”
‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्याला कन्यारत्नाचा लाभ; लेकीचा फोटो शेअर करत म्हणाला…
महेश कोठारे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. त्यांचे आई वडीलदेखील नाट्यसृष्टीत कार्यरत होते. आता त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे अभिनयात तसेच निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. महेश कोठारे यांनी ‘धुमधडाका’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले.