मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव टॉपला आहे. सामान्य लोकांनाही आपलासा वाटेल असे चित्रपट रुपेरी पडद्यावर घेऊन येणं ही नागराज मंजुळे यांची खासियत. त्यांनी आजवर ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. आता नागराज एक बायोपिक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत.

आणखी वाचा – Video : “लग्न करणं गरजेचंच आहे का?” श्री श्री रविशंकर यांना प्राजक्ता माळीचा प्रश्न, उत्तर देत म्हणाले, “काही लोक लग्न करुनही…”

हिंदीसह मराठीमध्येही आजवर बरेच बायोपिक चित्रपट प्रदर्शित झाले. आता नागराज यांनीही त्यांच्या नव्या बायोपिक चित्रपटाची घोषणा केली आहे. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या ते तयारीमध्ये आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच एका कार्यक्रमामध्ये भाष्य केलं आहे.

‘टीव्ही ९’च्या वृत्तानुसार, नागराज यांनी कोल्हापूरच्या शिरोळ भागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये हजेरी लावली होती. यावेळी नागराज म्हणाले, “खाशाबा जाधव हे जागतिक दर्जाचे कुस्तीपटू होते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी योजना आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तयारी करून ही घोषणा करता येईल अशी मला आशा आहे.”

आणखी वाचा – कधीकाळी रस्त्यावर झोपणारा पुण्यातील एमसी स्टॅन २३व्या वर्षीच कमावतो लाखो रुपये, इन्स्टाग्रामवरील एका रिलसाठी घेतो तब्बल…

“खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. याबाबत लवकरच मी तुम्हावा कळवेन. या चित्रपटाचं चित्रीकरण कुठे करता येईल हा नंतरचा भाग आहे. पण जर याच भागामध्ये शूट केलं तर अधिक आनंद होईल.” खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक पदकानंतर खाशाबांचे कौतुक झाले.