मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव टॉपला आहे. नागराज यांनी आजवर ‘फ्रँड्री’, ‘सैराट’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यांचा हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरले. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांच्या या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता नागराज यांच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नागराज एक बायोपिक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी या चित्रपटाची आता अधिकृत घोषणा केली आहे. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नागराज बनवणार आहेत. स्वतः ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. याबाबत त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने ट्रेलर समोर येण्याआधीच कमवले ‘इतके’ कोटी, आकडा वाचून व्हाल आवाक्
‘खाशाबा’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. दिग्दर्शनासह चित्रपटाची निर्मितीही नागराजच करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टवर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा चेहरा लपवण्यात आला आहे. खाशाबा’ची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नागराज मंजुळेंची पोस्ट
आणखी वाचा – शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’मध्ये जाण्यासाठी करतोय जोरदार तयारी, म्हणाला “मला पाण्याची भीती वाटते, पण…”
नागराज या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हणाले, “ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळत आहे. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. ‘फँड्री’, ‘सैराट’ नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करत आहे. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसह हा माझा पहिलाच चित्रपट आहे. निखिल साने सर ‘फँड्री’पासून बरोबर आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल. चांगभलं”. नागराज यांच्या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत.