चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारणार नाही असं जाहीर करत अभिनेत्याने शिवरायांच्या भूमिकेची रजा घेतली आहे. चिन्मयने घेतलेल्या या निर्णयावर आता मराठी कलाविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिन्मय मांडलेकरचे चाहते अभिनेत्याचा हा निर्णय ऐकून प्रचंड नाराज झाल्याचं कमेंट्स सेक्शनमध्ये पाहायला मिळालं. याशिवाय गौतमी देशपांडे, सुरुद गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर, शिवाली परब, मृण्मयी देशपांडे अशा अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्याला पाठिंबा देत ‘कृपया हा निर्णय मागे घे’ अशी विनंती केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मराठीसह हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील पोस्ट शेअर करत सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

हेही वाचा : “जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती

“चिन्मय आणि नेहा आम्ही सर्व सदैव आपल्या कुटुंबाबरोबर आहोत. असल्या ट्रोलर्सवर कडक कारवाई करण्याची विनंती मी सायबर सेल तसेच महाराष्ट्र सरकारकडे करतो. चिन्मय आपण आपला निर्णय मागे घ्यावा ही नम्र विनंती” अशी पोस्ट शेअर करत रवी जाधव यांनी आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : अयोध्येला पोहोचला रितेश देशमुख! पत्नी जिनिलीया व मुलांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन, फोटो शेअर करत म्हणाला…

रवी जाधव यांची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, चिन्मय मांडलेकरने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टक मालिकेतील पाचही चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील आणखी ३ चित्रपट प्रदर्शित होणे बाकी असतानाच चिन्मयने हा मोठा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या सर्व स्तरांतून चिन्मयला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.