दिग्दर्शक संजय जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं नाव आहे. संजय यांनी एकापेक्षा एक उत्तम चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. ‘दुनियादारी’ हा त्यांचा चित्रपट तर अगदी सुपरहीट ठरला. मात्र या चित्रपटाचं काम सुरू असताना त्यांचे वडील एका गंभीर आजाराशी सामना करत होते. बँकेमध्ये नोकरी करत असलेले संजय जाधव यांच्या वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान होता. याचविषयी संजय जाधव यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – सैफ अली खानचं लग्न झाल्यावर लेकापासून विभक्त राहू लागल्या शर्मिला टागोर, म्हणाल्या, “आईला गृहित धरलं जातं कारण…”

bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
Avinash Jadhav slam Sanjay Raut
MNS : “बाळासाहेबांना पण उभं राहायला ३७ वर्षे लागली होती”, मनसेचा वापर होतोय म्हणणाऱ्या राऊतांना अविनाश जाधवांचे सडेतोड उत्तर

अभिनेत्री सुलेखा तलवळकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय यांनी आपल्या वडिलांच्या आजाराविषयी सांगितलं. ते म्हणाले, “माझे वडील माझ्यासाठी हिरो होते. मी त्यांना आप्पा म्हणायचो. ते सेवानिवृत्ती होते. ते मला एक दिवस म्हणाले की, त्यांचा हाताचा अंगठा हालत नाही. मलाही बरेच दिवस वेळ नव्हता. पण एक दिवस अमेय खोपकरने मला हिंदुजा रुग्णालयामध्ये डॉक्टरची अपॉईमेंट मिळवून दिली. मी तिथे आप्पांना घेऊन गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना नेमकं काय होतंय हे विचारलं. आम्ही एकत्रच होतो. डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर बाहेर जाऊन जरा आमचं रुग्णालय बघा कसं आहे असं आप्पांना सांगितलं.”

“आप्पा बाहेर गेल्यानंतर डॉक्टर मला म्हणाले फक्त दीड वर्ष. मला कळेना नेमका याचा अर्थ काय? डॉक्टरांनी मला सांगितलं त्यांना एक आजार आहे. यामध्ये त्यांच्या शरीराचा एक एक अवयव निकामी होत जाईल. फक्त शेवटी फुफ्फुसं राहतील. पुढेच सहा ते सात तास मला कोणत्याच गोष्टीचा अर्थ लागत नव्हता. प्रत्येक दिवशी माझ्या वडिलांचे अवयव निकामी होताना मी पाहिले. यानंतर माझं चित्रीकरणही रद्द होऊ लागलं. सहा ते सात महिने माझं चित्रीकरण बंद राहिलं. यादरम्यान मी फक्त घरातच राहिलो. वडिलांबरोबर एकत्र वेळ घालवू लागलो. आप्पांना विस्की प्यायला खूप आवडायची. मग आईपासून लपवत मी आप्पांबरोबर बसायचो.”

आणखी वाचा – Video : “लोकांना का त्रास देता?” अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्तोत्रम्’ गातानाचा व्हिडीओ, नेटकऱ्यांना संताप अनावर

पुढे ते म्हणाले, “त्याचदरम्यान ‘दुनियादारी’ चित्रपटाचं काम सुरू झालं. या चित्रपटाचं कामंही माझ्या घरी सुरू होतं. आप्पा एका रुममध्ये असायचे. ‘दुनियादारी’चं चित्रीकरण पुण्याला सुरू झालं. मीही पुण्यातच होते. तेव्हा आप्पा अंथरुणाला खिळले होते. एक दिवस ते प्रमिताला म्हणाले, मला ना जायचं आहे पण त्याचं चित्रीकरण पूर्ण होऊदे मग जातो. प्रमिताने आप्पांचं हे बोलणं मला सांगितल्यावर मला कळेना काय बोलावं. एक दिवस फोन आलाच. त्यादिवशी योगायोगही असा होती की, ‘दुनियादारी’मधील एक सीन मी चित्रित करत होतो. तो सीन असा होता की श्रेयस हे पात्र अंथरुणाशी खिळलेल्या त्याच्या वडिलांना रुग्णालयामध्ये बघण्यासाठी जातो. हा सीन शूट केल्यानंतर मी आप्पांना भेटायला आलो. आप्पा रुग्णालयामध्ये होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा मी रुग्णालयामध्ये गेलो. त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला हे सांगत होते की, अरे वा, आलास तू. म्हणजे चित्रीकरण संपलं. त्यांनी मला बघितल्यानंतर जीव सोडला. मी दुनियादारीच्या यशाचं श्रेयही आप्पांनाच देतो.” संजय जाधव यांनी सांगितलेला हा प्रसंग खरंच मनाला चटका लागून जाणारा आहे.

Story img Loader