लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कधी मजेशीर पोस्ट शेअर करत असतात तर कधी नवनवीन चित्रपटाविषयी स्वतःचं मत व्यक्त करत असतात. विजू मानेंच्या पोस्ट या नेहमीच चर्चेचा विषय असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आहे; ज्या पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दिग्दर्शक विजू माने यांनी पत्नी अनघा माने यांचा फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिली आहे. फोटोमध्ये अनघा त्यांच्या लग्नाच्या अल्बम बरोबर दिसत आहेत. विजू माने यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने ही खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा – Premachi Goshta: कोळी पेहरावात पाहून राज हंचनाळेच्या बायकोची होती ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाली, “घरी…”
विजू मानेंनी पत्नीचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, इतकं जुनं झालंय आमचं लग्न. कधी होईल? होईल का? निभवेल का? सगळ्या प्रश्नांवर उत्तरं दिली अगदी शाळेतल्या प्रश्नपत्रिकेसारखीच. सुरुवातीलाच प्रचंड खाडाखोड…मला ‘एका वाक्यात उत्तरं’ हवी होती, तिला ‘संदर्भासहीत स्पष्टीकरण’. मी ‘कवितेतत’ रमलेला… ती माझ्या ‘गाळलेल्या जागा’ भरत बसली होती. ‘थोडक्यात उत्तर’ देऊ म्हटलं तर तिचा अख्खा ‘निबंध’ तयार असायचा. माझ्या ‘समानार्थी’ शब्दांना कायम तिच्या ‘विरुध्दार्थी’ शब्दांना भिडायचं होतं. माझे सगळे ‘कर्तरी, कर्मणी’ प्रयोग तिने ‘भावे’ मानून घेतले. काही केल्या ‘जोडी’ जुळता जुळेना. आणि शेवटी ‘पुढीलपैकी एक पर्याय’ निवडायची वेळ आली…मग शांतपणे विचार केला साला हिच्या बरोबर कसं जगणार??? पण हिच्याशिवाय मरण्यापेक्षा पहिला पर्याय बेटर (better) वाटला. पैकीच्या पैकी कुणालाच मिळत नसतात…. पण काही गोष्टी ‘OPTION’ला (पर्यायी) टाकल्या की ‘Distinction’ (डिस्टिंक्शन) अवघड नसतं. मला विचारा १४ वर्षांच्या अनुभवावरून सांगतोय. आम्ही अपूर्ण असलो तरी परिपूर्ण जोडपं आहोत…अनघा विजू माने तुला लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा…परीक्षा संपलेली नाही….परीक्षा संपत नसते.
हेही वाचा – शुभांगी गोखलेंनी दोन्ही हातावर स्वतः काढली मेहंदी, हे पाहून तेजश्री प्रधान कौतुक करत म्हणाली, “ती स्वयंभू…”
दरम्यान, विजू माने यांच्या पत्नीने देखील सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, “१४ वर्ष, वनवासाची , लग्न म्हणजे शहिद होतोय ना तो, बायको म्हणते तर करायला पाहिजे मी किती घाबरतो etc etc….. खूप सारे जोक होत असतात……. खूप अजूनही ऐकतच असते पण ते जोक म्हणूनच घेऊन आपण १४ वर्ष वनवासाची नाही गेली तर खूप भांडणाची, खूप कटकटीची, पण त्यापेक्षा जास्त खूप जास्त समजून घेण्याची, खूप जास्त प्रेमाची आणि नातं घट्ट होण्याची संपली पण अजून खूप वर्ष एकमेकांना सहन करण्याची, मजेत सहवासाची जायची आहेत. माने पुढील बऱ्याच वर्षांसाठी तयार राहा…लग्नाच्या वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा नवरोबा…खूप सारं प्रेम…”
दरम्यान, विजू मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या ‘स्ट्रगलर साला सीझन तीन’चा सहावा एपिसोड प्रदर्शित झाला होता. आतार्यंत या एपिसोडला ९ लाख ३० हजारपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये विजू माने यांच्याबरोबर कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण पाहायला मिळत आहेत.