मराठी अभिनेत्री सुकन्या मोने सध्या ‘बाईपण भारी देवा’चित्रपटामुळे चर्चेत आहेत. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांची महत्वाची भूमिका आहे. मुख्य म्हणजे याच चित्रपटातून सुकन्या मोने यांची मुलगी जुलियाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मात्र, एकेकाळी ‘मूल होऊ देऊ नकोस असा सल्ला डॉक्टरांनी सुकन्या मोनेंना दिला होता. काय आहे तो किस्सा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं, अनुभव शेअर करत म्हणाली…

संजय मोने यांच्याशी लग्न झाल्यानंतर काही वर्षांनंतर सुकन्या मोने यांचा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांच्या उजव्या अंगाला पॅरालिसिस झाला होता. त्या अनेक महिने बेडरेस्टवर होत्या. चोवीस तास बेडवर असल्यामुळे त्यांचं वजनही वेगाने वाढू लागलं होतं. पण यातूनही त्या बऱ्या झाल्या. मात्र, लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतरही त्यांना मूल होत नव्हतं. अखेर त्यांनी शेवटचा चान्स घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र, डॉक्टरांनी सुकन्या मोनेंना मूल होऊ देऊ नकोस नाहीतर तुला त्रास होईल. कदाचित तुझ्या जीवालाही धोका होऊ शकतो’ असा सल्ला दिला. मात्र, सुकन्या मोने आपल्या निर्णयावर ठाम होत्या. संजय मोने आणि त्यांच्या सासूबाई सुद्धा त्यांच्या या निर्णयाला विरोध केला. मात्र, सुकन्या हट्टाला पेटल्या होत्या. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि जुलियाचा जन्म झाला. जुलियाच्या जन्माने माझ्या पोटी देवीच जन्माला आली, अशी प्रतिक्रिया सुकन्या मोने यांनी दिली होती.

हेही वाचा- “‘बाईपण भारी देवा’ धडाक्यात चालतय त्यामागे…” केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले “गेली दोन वर्ष हा चित्रपट…”

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला पहिल्या शो पासून प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करताना पाहायला मिळत आहे. तसेच अनेकजण इतरांना हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचं आवाहनदेखील करत आहेत.