डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट दसऱ्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. याआधी अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. ‘शिवप्रताप गरुडझेप’मध्येही छत्रपती शिवाजी महारांची भूमिका त्यांनीच साकारली आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अमोल कोल्हे यांनीचा याबाबतचा एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही हा चित्रपट पाहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका आणि त्यादरम्यानचा थरार या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना ‘शिवप्रताप गरुडझेप’बाबत उत्सुकता लागून राहिली होती. आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट कसा वाटला? याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला खात्री आहे की महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचाही समावेश होईल.” हा चित्रपट जयंत पाटील यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे.

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होता शाहरुख खान, पत्नीला सत्य समजलं अन्…

‘शिवप्रताप गरुडझेप’मध्ये अमोल यांच्याबरोबरच यतीन कार्येकर, मनवा नाईक, प्रतीक्षा लोणकर, पल्लवी वैद्य, हरीश दुधाडे आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहते. यतिन कार्येकर यांनी अफजल खानाची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. तसेच काही अमराठी प्रेक्षकही हा चित्रपट आवडीने पाहत असल्याचं अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr amol kolhe historical movie shivpratap garudjhep release politician jayant patil watch film and his reaction see details kmd