आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. त्यांची हसण्याची विशिष्ट पद्धत ही प्रेक्षकांना खूप आवडते. पण या लोकप्रिय अभिनेत्याचे शिक्षण किती झालंय माहितीये का? जाणून घ्या…

हेही वाचा – “…म्हणूनच तुम्ही सिनेसृष्टीमधून बाहेर झालात”; नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “घरी या…”

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Dilip Halyal, comedian Dilip Halyal,
ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन
Film critic Aruna Vasudev passed away
चित्रपट समीक्षक अरुणा वासुदेव यांचे निधन
We celebrate Teachers Day but when will we do deep teacher training
आपण शिक्षक दिन साजरे करतो, पण प्रगल्भ शिक्षकनिर्मिती कधी करणार?
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
Mohanlal addresses media regarding Hema Committee report
Mohanlal on MeToo: मॉलीवूड लैंगिक शोषण प्रकरण: अभिनेते मोहनलाल यांचं मोठं विधान; “अनेक लोक यात..”

आपल्या अस्सल ग्रामीण लहेजाने मकरंद अनासपुरेंनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांनी अभिनया व्यतिरिक्त सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. एवढंच नाही तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती आहे. या सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी खूप धडपड करत मेहनत घेतली आहेत. मराठीबरोबर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा चिमुकला लेक लाटतोय पोळ्या; पाहा व्हिडीओ

मकरंद अनासपुरे यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे औरंगाबादमध्ये झालं आहे. १९९३ साली सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी बीएससी केलं आहे. तर १९९४ साली अनासपुरे यांनी औरंगाबाद विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स केलं आहे. १२वीमध्ये ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले असून १०वीमध्ये त्यांना ८० टक्के मिळाले आहेत.

हेही वाचा – अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

दरम्यान, मकरंद अनासपुरे कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी ‘सातच्या आत घरात’, ‘साडे माडे तीन’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘दे धक्का’, ‘सगळं करुन भागले’, ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘रंगा पतंगा’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ यांसारख्या बऱ्याच मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसेच ते ‘तू तू मै मै’, ‘माय फ्रेंड गणेश’, ‘जिस देश मे गंगा रहता है’, ‘सीआयडी’ सारख्या हिंदी मालिकांमध्ये झळकले आहेत. शिवाय त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं आहे.