९०च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या त्या काळात जितक्या लोकप्रिय होत्या तितक्याच आजही आहेत. मालिका, चित्रपट, नाटक, वेब सीरिज या चारही क्षेत्रात आपल्या अभिनयानं, सौंदर्यानं त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या यांनी जरी पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्या तारुण्याचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. अशा या चिरतरुण अभिनेत्रीचं शिक्षण नेमकं काय झालंय? ते जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Bigg Boss OTT 2च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानने केला खुलासा, म्हणाला, “जेलमध्ये…”

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे योगा व्हिडीओ, रील्स आणि फोटो नेहमीच चर्चेत असतात. नुकतीच त्यांची ‘ताली’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. सध्या या वेब सीरिजमधील त्यांच्या कामाचं जोरदार कौतुक होतं आहे. अशातच ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ या सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर रीलसाठी केली जाते अशी तयारी; जुई गडकरी व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या सेशनमधून चाहत्यांनी ऐश्वर्या यांना त्यांच्या फिटनेसपासून ते त्यांच्या जन्मदिवसाच्या तारखेपर्यंतचे प्रश्न विचारले. एका चाहत्यानं विचारलं की, ‘तुम्ही केस का कापले? तुम्ही लांब केसांमध्ये भारी दिसता.’ यावर ऐश्वर्या यांनी आपल्या केसांचा फोटो शेअर करून सांगितलं की, “अजूनही माझे लांबच केस आहेत.” तर दुसऱ्या चाहत्यानं विचारलं की, ‘तुमचा वाढदिवस कधी असतो?’ तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘८ डिसेंबर.’ यानंतर चाहत्यांनी ऐश्वर्या यांच्या ‘ताली’ वेब सीरिजमधल्या कामाचं कौतुक केलं.

यावेळी एका चाहत्यानं ऐश्वर्या यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘बीएससी मायक्रोबायोलॉजी ॲनिमल कम्युनिकेटर रेकी (BSC microbiology animal communicator rekie)’.

हेही वाचा – ‘ताली’ वेब सीरिज पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “तृतीयपंथीयांच्या पालकांना…”

दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education of marathi actress aishwarya narkar pps
Show comments