लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावला आहे. असा हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट पहिल्यांदा बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रेच्या आजीला दाखवण्यात आला होता. याचा खुलासा स्वतः दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘सैराट’मधल्या बाळ्याची ‘ती’ जिवालिया कोण आहे? अभिनेता तिच्याविषयी सांगताना म्हणाला, “आमच्यामधलं इतकं रिलेशन भारी….”

सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलेवर नुकतीच सलील कुलकर्णी यांनी मुलाखती दिली. त्यावेळी अर्जुन पूर्णपात्रेच्या आजीचा ‘तो’ प्रसंग सांगत सलील कुलकर्णी म्हणाले, “आमच्या चित्रपटात चिंतनचं काम केलेला अर्जुन पूर्णपात्रे आहे. या मुलाचं मला खूप कौतुक आहे. त्याने खूप चांगलं काम केलंय. त्याला पूर्णवेळ चित्रपटाला त्याची आजी घेऊन यायची. त्या स्वतःही डॉक्टर होत्या. चित्रपट झाला आणि काही महिन्यातच त्यांना कॅन्सरचे निदान झाले. त्या अगदी शेवटचे काही दिवस असताना मला अर्जुनच्या आई-वडिलांनी फोन केला की, आजीला आता चित्रपट बघायलाच मिळणार नाही. तेव्हा लॉकडाऊन संपत होता. तर आता काय करता येईल? असा प्रश्न पडला.”

पुढे सलील कुलकर्णी म्हणाले, “तेव्हा डबिंग झालेलं नव्हतं. लॉकेशन साऊंडचं होता आणि बेसिक बॅकग्राऊंड केलेलं होतं. मी म्हटलं असा कसा चित्रपट पाठवणार. ते पण चाळीसगावाला. अजून प्रदर्शित झाला नाही. पाठवला आणि लीक झाला तर. मी दोन-तीन दिवस अस्वस्थ होता. मग मी नितीन वैद्यना म्हटलं, काय करू या? तर तो म्हटला, भीती तर वाटतेय. कारण तोही माझ्यासारखा चलबिचल झाला होता. मी त्याला म्हटलं, इतका संवेदनशील चित्रपट करायचा आणि अशा वेळेला तो पाठवायचा नाही, हे चुकीच वाटतं नाही तुला? तर तो म्हटला, हो बरोबर आहे. आपण पासवर्ड प्रोटेक्टेड पाठवू. तो चित्रपट आम्ही त्यांना पाठवला. तो चित्रपट आजींनी पाहिला आणि १५ दिवसांनी त्यांचं निधन झालं.”

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट; सुमीला वाचवायला गेलेल्या अप्पूचा जीव येणार धोक्यात?, पाहा

“त्यांचं निधन होण्याआधी त्यांनी मला बेडवर झोपल्या झोपल्या छान व्हिडीओ करून पाठवला होता. तुम्ही छान चित्रपट केलाय. माझ्या नातवाला घेतलंय म्हणून नाही. त्याने चांगलंच काम केलंय. पण मला त्याच्यापेक्षा तुमचं कौतुक आहे, तुम्ही अशा विषयावर चित्रपट केला. एक डॉक्टर म्हणून मी सांगते,” असं सलील कुलकर्णी म्हणाले.

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; अलीकडेच सुयश टिळकची मालिकेत झाली होती एंट्री

दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला ‘आयुष्यावर बोलू काही’ला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. सलील यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekda kaay zala movie was first shown to grandmother of child actor arjun purnapatre character says saleel kulkarni pps
Show comments