अनेक मराठी अभिनेते व अभिनेत्री आपल्याला हिंदीसह इतर भाषांमधील चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम करताना दिसतात. आता एक हिंदीतील लोकप्रिय अभिनेता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. ‘फॅमिली मॅन’ अन् ‘असुर’ यासारख्या लोकप्रिय सीरिजमध्ये झळकलेला अभिनेता मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून त्यात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. ओटीटीवरील गाजलेल्या सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता शारीब हाश्मी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन वेगळ्या कथा, पण एकमेकांशी संबंधित

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘मल्हार’चे पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची कथा ही गुजरातमधील कच्छ भागातील ग्रामीण भागात घडते. या चित्रपटात तीन वेगवेगळया कथा घडताना पाहायला मिळणार आहेत. या कथा वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकांशी संबंधित आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल, याची खात्री आहे.

चाळीत जन्मलेला विकी कौशल आहे उच्च शिक्षित, जाणून घ्या कतरिना कैफच्या पतीची शैक्षणिक पार्श्वभूमी

मल्हार चित्रपटाचे पोस्टर (फोटो – पीआर)

चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?

‘मल्हार’चे निर्माते प्रफुल पासड असून या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, हृषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, विनायक पोद्दार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि रवी झंकाल प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे.

हेही वाचा – “एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक काय म्हणाले?

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणतात, “हा चित्रपट गावाकडील अनेक विषयांवर आधारित असून यात अनेक पात्रांचा समावेश आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी कथा आहे. मैत्री, प्रेम,विश्वास अशी भावनात्मक जोड प्रेक्षकांना यात बघायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक नवा अनुभव असेल असे म्हणायला हरकत नाही. ‘मल्हार’ला प्रेक्षक पसंती दर्शवतील याची मला खात्री आहे.”

दरम्यान, शारीबच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने तरला, फिल्मिस्तान, माय क्लायंट्स वाईफ, द डेविल इनसाईड अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family man fame sharib hashmi in marathi movie malhar first poster out hrc