अडीच महिन्यांपासून मणिपूरध्ये कुकी व मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामधील लैंगिक अत्याचाराच्या व्हिडीओने संपूर्ण देशाला हादरवले आहे. ४ मे रोजी घडलेल्या या घटनेवर सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कलाकार मंडळीही यावर व्यक्त होताना दिसत आहेत. गीतकार, गायक, अभिनेता, पटकथा लेखक व दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांनी या घटनेवर चारोळी लिहिली आहे. या चारोळीच्या माध्यमातून त्यांनी राजकारण्यांना सणसणीत टोला लगावला आहे.
स्वानंदी किरकिरे यांनी ट्वीट करत चारोळी लिहिली आहे. “मणिपूर की लड़कियाँ बोली ,,, ओह भारत ओह इंडिया! इज़्ज़त की बची ना चिंधियाँ. वहाँ बिके पवार और सिंधिया. तुम पार्लियामेंट बनाओ नई लगाओ नई नई कुर्सियाँ ,, जनता की काटो मुण्डियाँ ..महँगे टमाटर भिण्डियाँ ओह भारत ओह इंडिया धिक्कार लिज़लिजा मीडिया! सिर्फ़ और सिर्फ़ शर्मिंदगियाँ”
हेही वाचा – शितलीची तिसरीही मालिका ठरली फ्लॉप; आता ‘लवंगी मिरची’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
हेही वाचा – “नको गं नको” मृण्मयी देशपांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवर बिग बॉस फेम ‘अभिनेत्याची’ प्रतिक्रिया
स्वानंदी किरकिरेंच्या या चारोळीवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. तसेच अभिनेते या घटनेवर व्यक्त झाल्याबद्दल नेटकरी आभार मानत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे, “साहेब, बंगालला अजून एक घटना घडली मणिपूरसारखी. चला, एक होऊन जाऊ द्या कविता. उद्याच पोस्ट कराल, अशी अपेक्षा करतो.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे, “त्या चीनला जर मणिपूर पाहिजे असेल, तर देऊन टाका; नाही तरी आमच्या पंतप्रधानांना तिथे इंटरेस्ट नव्हता कधीही. ईशान्येकडील राज्यं नेहमीच त्रासलेली आहेत धरसोड वृत्तीनं. मे महिन्यातील व्हिडीओ आज जुलैमध्ये बाहेर येत आहेत. आमच्या पंतप्रधानांना काही पडलीच नाहीये. त्यांना कसंही करून सत्तेत राहायचं आहे.”
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरची अर्जुन-सायलीची पहिली भेट कशी होती?, जाणून घ्या
दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने स्वानंदी किरकिरे यांचे हे ट्वीट इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट करीत लिहिले, “मानवता, समानता, शांतता आणि एकता नाहीशी झालेली आहे.”