झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल काही दिवस लंडन दौऱ्यावर होता. संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटात तो महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो लंडनला गेला होता. अशातच त्याचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे कुशलला वेगळी ओळख मिळाली. या कार्यक्रमामुळे त्याचा चाहतावर्गही खूप वाढला. कुशलही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी, त्याचे विचार चाहत्यांशी शेअर करत असतो. आता त्याने पोस्ट केलेला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कुशल एका रोमॅंटिक मराठी गाण्यावर त्याच्याच धुंदीत चालताना दिसत आहे. या स्लो मोशन व्हिडीओला कॅप्शन देत त्याने लिहीलं. “असलं एखादं गाणं आपल्यावर शूट व्हायला हवं यार. तो पर्यंत दुसऱ्यांच्या गाण्यांवर एन्जॉय करत राहू.” आता त्याच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत, ‘या’ आगामी ऐतिहासिक चित्रपटातील लूक प्रदर्शित, म्हणाला…

त्याचे चाहते कमेंट्स करत त्याचा हा अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. एकाने लिहीलं, “या जेंटलमनसाठी माझ्या मनात नेहमी आदर असतो.” तर दुसऱ्याने लिहीलं, “नक्की एखाद्या दिवशी तुझ्यावर गाणं शूट होईल.” तर आणखी एक चाहता म्हणाला, “तू खरंच आमचा फेव्हरेट आहेस.. माननीय अशोक मामांनंतर तूच आहेस.. तुला शुभेच्छा कुशल मित्रा.” तर या कमेंट्सवर कुशलनेही रेड हार्ट इमोजी देत देत चाहत्यांचे आभार मानले. फक्त कुशलचे चाहतेच नाही, तर मनोरंजनसृष्टीतील त्याचे मित्रमंडळीही कमेंट्स करत त्याचा हा अंदाज आवडल्याचं सांगत आहेत.

Story img Loader