नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. २०१४ प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तरीही तितक्याचं आवडीने आजही ‘फ्रँडी’ चित्रपट पाहिला जातो. तसंच चित्रपटातील गाणी प्रत्येक कार्यक्रमात लावली जातात. ‘फ्रँडी’ चित्रपट जितका मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजला, तितकीच चित्रपटातील जब्या आणि शालूची जोडी गाजली. आजही जब्या आणि शालूला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण अजून काही ती वेळ पुन्हा आली नसली तरी जब्या आणि शालू सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून एकत्र पाहायला मिळतात. सध्या जब्या आणि शालूचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

‘फँड्री’ चित्रपटात शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरातने जब्या म्हणजे अभिनेता सोमनाथ अवघडेबरोबर व्हिडीओ शेअर केला आहे. “& forever” असं लिहित राजेश्वरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राजेश्वरी व सोमनाथने ‘फ्रँडी’ चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये जब्या शालूवर काळी राख उधळताना दिसला होता. हाच सीन या व्हिडीओत रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओत जब्या शालूवर काळी राख ऐवजी फुलं उधळताना दिसत आहे. दोघांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमात डफली वाजवत ओरीचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

राजेश्वरी आणि सोमनाथच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. “एक नंबर जोडी”, “जब्याला चिमणी सापडली”, “राख पाहिजे होती लेका”, “आमचा जब्या आणि त्याची नजर आहे तशीच आहे”, “अरं जब्या काळ्या चिमणीची राख उडवायची होती, फुलं नाही”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्हिडीओवर उमटल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुम्ही लग्न करा यार” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “असा चित्रपट पुन्हा कधीच होणार नाही…खरंच त्याकाळी ‘फँड्री’ चित्रपट पाहून जाणीव झाली आणि बदलही झाला…” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “साऱ्या गावात चर्चा कुठली, आमच्या जब्याला शालू पटली.”

हेही वाचा – Video: वनतारा थीमने सजलेल्या रथावरून अनंत-राधिकाची ‘मामेरू’ कार्यक्रमात एन्ट्री, अंबानी-मर्चंट कुटुंबाने केलं जंगी स्वागत

दरम्यान, जब्या आणि शालूच्या या व्हिडीओला आतापर्यंत २२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखांहून अधिक जणांनी दोघांचा हा व्हिडीओ लाइक केला आहे. अनेक जण ‘फ्रँडी २’ चित्रपटाची मागणी करताना दिसत आहेत.

Story img Loader