Rajeshwari Kharat Baptised : नागराज मंजुळे यांचा गाजलेला चित्रपट ‘फँड्री’मध्ये मुख्य भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री राजेश्वरी खरातने एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो धर्मांतराबद्दलचा असल्याचं कॅप्शनवरून दिसतंय. ‘शालू’ने पोस्ट केलेला फोटो पाहून चर्चांना उधाण आलं आहे.
राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. आता तिने पोस्ट केलेला फोटो पाहून तिने धर्मांतर केल्याचं म्हटलं जात आहे. राजेश्वरीने पोस्ट केलेला फोटो नेमका काय ते जाणून घेऊयात.
फोटोमध्ये राजेश्वरी पाण्यात हात जोडून, डोळे बंद करून उभी आहे. एका व्यक्तीचा हात तिच्या डोक्यावर दिसतोय, तर एका व्यक्तीचा हात तिच्या खांद्यावर दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना Baptised हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ ख्रिश्चन धर्मात प्रवेश असा होतो. त्याचबरोबर रेड हार्ट इमोजी देखील वापरला आहे.
पाहा राजेश्वरीची पोस्ट
दुसऱ्या एका पोस्टमध्ये राजेश्वरीने कुटुंबातील काही सदस्यांबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने न्यू बिगिनिंग्स, इस्टर असे हॅशटॅग दिले आहेत.
फोटो व कॅप्शन पाहून राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं दिसत आहे. राजेश्वरीच्या या फोटोवर विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहे. “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांविरोधात जाऊन जातीयवाद मिटवावा म्हणून संघर्ष केला आणि बुद्ध धर्म स्वीकार केला आपण तोच धर्म तुम्ही सोडून कॅथलिक धर्म स्वीकार केला….शेम ऑन यू,” अशी कमेंट तिच्या एका पोस्टवर एका युजरने केली आहे. “महाराष्ट्र देशात बहुतेक ठिकाणी पैसे, ईश्वराच्या चमत्कारची भूल देऊन धर्म परिवर्तन केले जात आहे.. आता सरकारने ख्रिश्चन धर्मात परिवर्तन केलेल्या या लोकांचा कास्ट सर्टिफिकेट कॅन्सल करणे गरजेचं आहे.. आणि या ख्रिश्चन मिशनरीवर लक्ष देणं गरजेचं आहे,” अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे.

“फुकट तांदूळ मिळतात ना.. आणि सांता गिफ्ट देऊन आपले वडील बदलून देतात… मस्तय सगळ. तुम्हाला तुमच्यावर विश्वास नाही.. तुमच्या पूर्वजावर विश्वास नाही.. तुम्ही कोणाचेच होऊ शकत नाही. Shame on you… Shame on you…”, अशीही कमेंट राजेश्वरीच्या पोस्टवर आहे.
दरम्यान, राजश्रीने खरंच ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘फँड्री’तील अभिनेता सोमनाथबरोबर लग्नाचा फोटो पोस्ट केल्यावर आता ती तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आहे.