‘फँड्री’ चित्रपट बरोबर ११ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे नवखे कलाकार झळकले होते. या चित्रपटात दोघांनी जब्या व शालूची भूमिका साकारली होती. ‘फँड्री’ने बॉक्स ऑफिसवर त्याकाळी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता हे दोन्ही कलाकार मोठे झाले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर देखील राजेश्वरी आणि सोमनाथ हे दोघं नेहमी सक्रिय असतात.

‘फँड्री’मधली जब्या आणि शालूची जोडी प्रेक्षकांच्या एवढी पसंतीस उतरली की, आजही सोमनाथ आणि राजेश्वरीचा उल्लेख सर्वत्र चित्रपटातील भूमिकेच्या नावानेच केला जातो. नुकताच राजेश्वरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सर्वत्र चर्चेत आला आहे. अभिनेत्री नवीन फोटोशूट आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. परंतु, या सगळ्यात तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ही पोस्ट नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

हेही वाचा : Video: आमिर खानचा जावई अन् विहीणबाईंची परदेशवारी, नुपूर शिखरेची आईसह थायलंडमध्ये धमाल, स्कुटीवर फिरले माय-लेक

राजेश्वरीने तिच्या चाहत्यांसाठी अज्ञात असणाऱ्या एका मुलाबरोबर फोटो शेअर करत कमेंटमध्ये लव्ह इमोजी शेअर केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचं जमलं का? ती रिलेशनशिपमध्ये आहे का? अशा सगळ्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. मध्यंतरी राजेश्वरीने सोमनाथ अवघडेसह फोटो शेअर केला होता. तेव्हा देखील त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, आता शालुने शेअर केलेल्या या नव्या फोटोमुळे तिचे सगळेच चाहते संभ्रमात पडले आहेत. अभिनेत्रीच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये राजेश्वरीला खऱ्या आयुष्यातील जब्या मिळाल्याचं म्हटलं आहे.

राजेश्वरी खरातच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “जब्यासाठी दोन मिनिटं मौन”, “शालू-जब्या…धोका”, “हा कोण आहे?”, “शालूने जब्याला धोका दिला”, “जब्या मोठा गेम झाला रे”, “जब्या कडून आंदोलनाला बसणार”, “काळी चिमणी गावली लेकाला”, “लव्हबर्ड्स”, “जब्या तुझं अवघड आहे आता”, “शालू जमलं का?” अशा भन्नाट प्रतिक्रिया अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : Video : लंडनमध्ये फिरणाऱ्या प्रिया-उमेशचं ‘या’ व्यक्तीशी जुंपलं भांडण, मजेशीर व्हिडीओवर मराठी कलाकारांच्या भन्नाट कमेंट्स

rajeshwari
राजेश्वरीच्या फोटोवरील कमेंट्स

दरम्यान, राजेश्वरीबरोबर फोटोत दिसणाऱ्या मुलाचं नाव रोहन गवई असं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘फँड्री’ चित्रपटामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. सध्या ती सोशल मीडियावर सक्रिय असून रिल्स व्हिडीओ व फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Story img Loader