नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या सुपरहिट चित्रपटातील मुख्य कलाकार जब्या म्हणजे अवघडे व शालू म्हणजेच राजेश्वरी खरात दोघेही सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. राजेश्वरीने सोमनाथबरोबर हळदीचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात लग्न करतेय का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. राजेश्वरीची पोस्ट चर्चेत असतानाच आता सोमनाथने एक फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फँड्री’ सिनेमातून नागराज मंजुळे यांनी ग्रामीण महाराष्ट्राचं समाजवास्तव प्रेक्षकांसमोर मांडलं होतं. या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील शालू व जब्या सध्या एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करत आहेत.

हेही वाचा – ‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”

राजेश्वरीने शेअर केला हळदीचा फोटो

राजेश्वरीने इन्स्टाग्रामवर सोमनाथबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो लग्नमंडपातील आहे. या फोटोमध्ये राजेश्वरी आणि सोमनाथ डोक्याला मुंडावळ्या बांधून पाटावर बसल्याचं दिसतंय. राजेश्वरीने कोणतंही कॅप्शन न देता हा फोटो शेअर केला आहे. राजेश्वरीने या फोटोत हळदी रंगाची साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा असा नवऱ्या मुलीसारखा लूक केला आहे. तर, सोमनाथने सदरा घालून, डोक्यावर टोपी, कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत. ‘सर सुखाची श्रावणी’ या गाण्यावर राजेश्वरीने हा फोटो पोस्ट केला आणि दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच सोमनाथने एक नवा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे.

सोमनाथने शेअर केलेला फोटो

सोमनाथने इन्स्टाग्राम स्टोरीवर राजेश्वरी खरातबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत. सोमनाथने राजेश्वरीच्या खांद्यावर हात ठेवला असून ते एकमेकांच्या डोळ्यांत पाहत आहेत. त्यांचा हा रोमँटिक फोटो खूपच व्हायरल होत आहे. आधी राजेश्वरीने शेअर केलेला फोटो आणि त्यानंतर आता सोमनाथची ही पोस्ट पाहून या दोघांचं खरंच लग्न जमलं की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सोमनाथ अवघडे राजेश्वरी खरातबरोबर शेअर केलेला फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

सोमनाथ व राजेश्वरी दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही बऱ्याचवेळा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात. मात्र आता त्यांनी थेट हळदीचा फोटो शेअर केला आहे. सध्या तरी हा फोटो शूटिंगचा वाटत आहे, मात्र राजेश्वरी किंवा सोमनाथने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fandry fame somnath awaghade shares romantic photo with rajeshwari kharat softnews hrc