लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात . दैनंदिन जीवनातील गोष्टी शेअर करत असतात. काल, २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त त्यांनी एक कौतुकास्पद गोष्ट केली; ज्याचं सध्या कौतुक होतं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलील कुलकर्णी हे ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने लेक शुभंकरला घेऊन कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांनी शुभंकरला कुसुमाग्रज यांचं निवासस्थान दाखवलं आणि त्यांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गायीले. याचे व्हिडीओ सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा – नऊ महिने डेटिंग, दिल्लीत थाटामाटात लग्न अन् आता दोन वर्षांनी प्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, म्हणाला…

पहिला व्हिडीओ शेअर करत सलील कुलकर्णी यांनी लिहिलं आहे, “कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी – त्यांच्या जन्मदिनी आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी शुभंकरला घेऊन जाता आलं… तात्यासाहेबांना वंदन करता आलं…हे आमचं भाग्य…मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

तर दुसरा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, “शुभंकर आणि आज आमच्या कार्यक्रमात गाणी सादर करण्यासाठी आलेली गुणी गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांच्यासह कुसुमाग्रजांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गाता आले हे आमचं भाग्य आहे… मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

सलील कुलकर्णींच्या हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “वाह दादा फारच छान, तात्यांना विनम्र अभिवादन…मी फार भाग्यवान आहे की, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नाशिकमध्ये मी वास्तव्यास आहे…किती भाग्याची गोष्ट आहे…मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप छान, शुभंकर खरंच गुणी मुलगा आहे. आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श उदाहरणच आहे. तुमचे विचार खूप छान आणि तुमच्या मुलांकडे बघता तुम्ही त्यांच्यावर केलेले संस्कार ही दिसून येतात.” तर चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “शुभंकरला तुमच्याबरोबर पाहून खूप छान वाटलं.. पुढच्या पिढीपर्यंत हे पोहचणं खूप गरजेचं आहे. मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा.”

दरम्यान, सलील कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आयुष्यावर बोलू काही’ हा त्यांचा कार्यक्रम सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. येत्या ३ मार्चला या कार्यक्रमाचा पुढील प्रयोग होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fans appreciate to saleel kulkarni that action is being pps
Show comments