सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ‘गुलाबी साडी’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. संजू राठोडच्या या गाण्यावर सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने रील्स व्हिडीओ बनवले आहेत. माधुरी दीक्षित, प्रार्थना बेहेरे, प्रिया बापट-उमेश कामत असे सगळेच कलाकार गेल्या काही दिवसांत गुलाबी साडी गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाविश्वात नुकत्यात पार पडलेल्या फिल्मफेअर सोहळ्यात सुद्धा ‘गुलाबी साडी’ गाण्याचा जलवा पाहायला मिळाला. सिनेविश्वात फिल्मफेअर पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जातात. त्यामुळे दरवर्षी अनेक कलाकार या सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहतात. या सोहळ्यामध्ये संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं सादर करण्यात आलं.

हेही वाचा : मालिकेच्या निर्मात्याने थकवलेले पैसे, मृणाल दुसानिसने चार वर्षांनी ‘त्या’ घटनेवर केलं भाष्य, म्हणाली, “मी हळवी होऊन…”

‘गुलाबी साडी’ गाण्यावर रिंकू राजगुरु, सायली संजीव, अभिज्ञा भावे, प्रियदर्शिनी इंदलकर अशा सगळ्या अभिनेत्री एकत्र डान्स करत होत्या. या अभिनेत्री रंगमंचावर थिरकत असताना खाली दीपाली सय्यद आणि अमेय वाघ यांची ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्सची जुगलबंदी पाहायला मिळाली.

हेही वाचा : प्रथमेश परबच्या व्हिडीओवर लोकप्रिय अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “क्षितिजा तुझा नवरा खूप…”

सध्या फिल्मफेअर सोहळ्यातील हा व्हिडीओ सर्वत्र जबरदस्त व्हायरल होत आहेत. मराठी कलाकारांमध्ये असलेल्या सुंदर अशा बॉण्डिंगचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, या सोहळ्याविषयी सांगायचं झालं तर, यंदाच्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘आत्मपॅम्फ्लेट’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या दोन चित्रपटांनी बाजी मारली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filmfare marathi awards 2024 actors dances on gulabi sadi song at award function sva 00