Happy Friendship Day 2023 : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी दरवर्षी जागतिक मैत्री दिवस साजरा केला जातो. कुटुंबीयांप्रमाणे आपल्या आयुष्यात मित्रांचे महत्त्व देखील अनन्यसाधारण असते. आपले काही जिवलग मित्र आयुष्यातील कठीण प्रसंगात कायम आपल्या पाठिशी उभे राहतात. सामान्य माणसांप्रमाणे मनोरंजन विश्वातील काही कलाकारांचे सुद्धा एकमेकांशी घट्ट नाते आहे. आज मैत्री दिवसाच्या निमित्ताने मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “माझ्या मृत्यूचा प्रसंग…”, ‘हम आपके है कौन’ पाहून रेणुका शहाणेंचा मुलगा कोणावर संतापला? अभिनेत्रीने सांगितला किस्सा

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मैत्री दिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केदार शिंदे यांची अंकुश चौधरी, भरत जाधव, अरुण कदम, संजय नार्वेकर यांच्याबरोबर जवळपास २० ते २५ वर्ष घट्ट मैत्री आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत केदार शिंदेनी एक खास फोटो शेअर करत सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “हक्काने ज्यांच्या बरोबर लढता येतं…”; फ्रेंडशिप डे निमित्त कुशल बद्रिकेने शेअर केला जिवलग मित्रांसाठी खास व्हिडीओ

केदार शिंदेनी या फोटोला कॅप्शन देत “काही गोष्टींची सुरूवात करताना आपल्यासोबतचे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं…कोण कोण आहेत? ओळखलंत तर कमेंट्समध्ये सांगा.” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या मित्रांना टॅग करत त्यांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “UPSC चा फॉर्म भरायला विसरले अन्…”, स्पृहा जोशीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली “बाबांकडून सहा महिने…”

केदार शिंदेंनी शेअर केलेल्या जुन्या फोटोमध्ये अरुण कदम, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार, जयराज नायर हे मराठी कलाकार दिसत आहेत. नेटकऱ्यांनी सुद्धा या फोटोवर कमेंट करत बऱ्याच कलाकारांना ओळखले आहे. केदार शिंदेंप्रमाणे विजू माने, कुशल बद्रिके, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी सुद्धा मैत्री दिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केल्या आहेत.