रंगभूमीवर काम करत असताना अनेक कलाकारांची तारांबळ उडत असते. या तारांबळमध्ये कलाकारांची फजित होतानाही अनेकांनी पाहिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी बऱ्याच नाटकामध्ये काम केलं आहे. एका नाटकादरम्यान अशोक सराफांचीही फजिती झाली होती. मामांनी त्यांच्या ‘मी बहूरुपी’ या पुस्तकात या फजितीचा किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा- इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्याच्या घरचं जेवण सर्वात जास्त आवडतं?, महेश मांजरेकर म्हणाले…
‘बोल राधा बोल’ नाटकादरम्यान अशोक सराफांची प्रेक्षकांसमोर फजिती झाली होती. या नाटकात अशोक सराफांचा डबल रोल होता. तिसऱ्या अंकात एकाची एक्झिट झाली की साधारण पाच मिनिटात दुसऱ्याची एन्ट्री व्हायची. दुसरा होता मवाली. आणि त्याची एन्ट्री हातात सुरा घेऊन होती. अशोक सराफ म्हणाले, “विंगेत जीन्स बदलण्यात एवढी घाई व्हायची की, मी जेमतेम कमी वेळात तयार व्हायचो. त्यादिवशीसुध्दा घाईघाईत मी तयार झालो आणि चाकू घेऊन स्टेजवर एन्ट्री घेतली. मी स्टेजवर आलो आणि प्रेक्षकांमधून खूसपूस ऐकू आली. माझी भूमिका विनोदी नव्हती तरी असं का झालं याबाबत मला कळेना.”
मामा पुढे म्हणाले, “स्टेजवर नैना आपटे होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्या नुसत माझ्याकडे बघत होत्या. त्यांना धड मला काही सांगताच येईना. दोन क्षण आम्ही स्तब्ध. मला संशय आला तर मी खाली वाकून बघितलं तर माझ्या जीन्सची जीप खाली घसरली होती. पहिल्यांदा मी घाबरलो. पण नंतर हातातला सुरा खाली ठेवला. जीप वर घेतली आणि पुन्हा सुरा हातात घेऊन मवाल्याचे बेरिंग घेत डायलॉग म्हणायला सुरुवात केली. यावेळी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि माझे संवाद सुरु झाल्यावर सगळीकडे शांतता पसरली. खरं सांगतो तो एक क्षण असा होता जेव्हा मी जाम टरकलो होतो. प्रसंगावधान राखलं म्हणून वाचलो.”
हेही वाचा- Video “सगळे एका माळेचे मणी…”; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं परखड मत
दरम्यान काही दिवासांपूर्वी अशोक सराफांनी मराठी मराठी चित्रपट न करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अशोक सराफ म्हणालेले, “सध्या ला लिहून देणारा कोणी लेखकच नाही. विनोदवीर म्हणून मला ओळखलं जातं. सगळ्यांच्या नजरेत मी फक्त विनोदवीर आहे. पण इतरही भूमिका मी करू शकतो हे त्यांना माहित नाही. किंवा मी वेगळ्या भूमिका करु शकतो याची त्यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे कुणीही मला इतर भूमिकांसाठी विचारत नाही. फक्त विनोदवीर म्हणूनच माझा विचार करतात”.