Marathi Movie Fussclass Dabhade Trailer : आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. म्हणूनच एकत्र कुटुंब म्हटलं की, भरपूर प्रेम, काही मतभेद, एकत्र केलेली धमाल, काही हेवेदावे या सगळ्या गोष्टी आपसूक येतात. भावा-बहिणीचं नातं तर सगळ्यात वेगळं असतं. प्रसंगी बहीण आपली आई होते, तर भाऊ वडिलांसारखा कायम आपला पाठीराखा म्हणून मदतीसाठी तयार असतो. अशाच तीन इरसाल भावंडांची स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि क्षिती जोग या तिघांची जबरदस्त जुगलबंदी ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यांच्यात होणारे मतभेद, तरीही कायम घट्ट राहणारं नातं, कुटुंबातील गोडवा जपणारा आई, माहेरी राहणारी बहीण, लहान भावाचं लग्न, त्याच्या लग्नासाठी खास कामातून वेळ काढून आलेला मोठा भाऊ अशी परिपूर्ण कौटुंबिक कथा प्रेक्षकांना ‘फसक्लास दाभाडे’च्या निमित्ताने पाहायला मिळेल.

हेही वाचा : भाकरी, अख्खा मसूर, भरलं वांगं अन्…; कराडमध्ये संकर्षण कऱ्हाडेने ‘या’ पदार्थांवर मारला ताव; पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट

‘फसक्लास दाभाडे’ ( Fussclass Dabhade ) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर तसेच मुंबईत प्रेक्षकांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आला आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दाभाडेंच्या घरात तीन खांब आहेत. हे तीन खांब म्हणजे तायडी ( क्षिती जोग ), पप्पू ( सिद्धार्थ चांगेकर ), सोनू ( अमेय वाघ ). या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.

हेमंत ढोमे म्हणतो, “फसक्लास दाभाडे’ हा फक्त एक चित्रपट नाही तर कुटुंबातील विविध पैलूंना हसत-खेळत उलगडणारी एक सफर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या जुन्या-क्षणांचा, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपलासा वाटेल याची खात्री आहे.”

हेही वाचा : “एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट

हेही वाचा : Bigg Boss 18: २१ लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने चाहत पांडेच्या बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा, फोटो शेअर करत म्हणाला…

खुळ्या भावंडांची ही इरसाल स्टोरी प्रेक्षकांना २४ जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकही या चित्रपटाची ( Fussclass Dabhade ) आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fussclass dabhade trailer out now directed by hemant dhome starring these actors watch now sva 00