‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली.

या ट्रेलरची सुरुवात ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’ या प्रवासाने होते. बालपण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, निवडणुकीचा पराभव, जीवघेणा हल्ला, समाजकारण हे सर्व पैलूंची झलक गडकरी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
आणखी वाचा : “या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

यानंतर नितीन गडकरींचा खासगी आयुष्याचा प्रवास कसा होता, याचीही झलक यात पाहायला मिळत आहे. यानंतर भारतातील पहिला एक्सप्रेस वे, कमीत कमी खर्चात बांधण्याचा निर्णय आणि त्यासाठी करावी लागलेली धडपड याचा प्रवासही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.

विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये नितीन गडकरी यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही झलक पाहायला मिळत आहे. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या ‘गडकरी’ यांचा प्रवास येत्या २७ ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

आणखी वाचा : ‘गडकरी’ चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता, पहिला लूक आला समोर

नितीन गडकरी यांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या या कारकिर्दीतील अनेक चढ-उतार या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यांचे राजकीय आणि खासगी आयुष्य या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिजीत मजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. यात नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली आहे. तसेच या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर हे कलाकारही झळकणार आहेत. अनुराग भुसारी यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

Story img Loader