अभिनेते सचिन पिळगावकर गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यादेखील गेली अनेकवर्ष मालिका, चित्रपटांमधून काम करताना दिसून येत आहेत. सचिन आणि सुप्रिया या दोघांची मुलगीदेखील अभिनयात सक्रिय आहे. बालकलाकार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सचिन पिळगावकर यांना नुकताच आणखीन एक पुरस्कार जाहीर झाला आहे. बालदिनाचे औचित्य साधून यंदाचा गंधार गौरव पुरस्कार सचिन पिळगावकर यांना यंदाचा जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे, मंगळवारी ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी गडकरी रंगायतन येथे ही माहिती दिली आहे.
“मी सात महिने घरात…”; सई ताम्हणकरचा मानसिक तणावाबद्दल मोठा खुलासा
गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पिळगावकर यांना देण्यात येत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ऍड. आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर याना पुरस्कार देण्यात येणार आहे.
गंधार ही संस्था अनेक उपक्रम राबवत असते. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी गोखले आणि अभिनेत्री हेमांगी वेल्हणकर यांनी परीक्षण केले होते.