मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले. पण त्यातल्या काही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यापैकी एक म्हणजे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजे महाराष्ट्राचे लाडके निळू फुले. आपल्या अभिनयाच्या जोरावर निळू फुले घराघरात पोहोचले. त्यांची खलनायकाची भूमिका पाहून बायका रागावून बोटं मोडायच्या, शिवीगाळ करायच्या. प्रेक्षकांच्या याच प्रतिसादातून निळू भाऊंना त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली. निळू फुले जितके अभिनय क्षेत्रात सक्रिय होते तितकेच ते सामाजिक कार्यात देखील भाग घ्यायचे. आज निळू भाऊंचा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने त्यांची मुलगी गार्गी फुले-थत्ते यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गार्गी-फुले थत्ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात अविरत काम करत आहे. छोटी भूमिका असो किंवा मोठी प्रत्येक विविधांगी भूमिका स्वीकारताना त्या दिसत आहेत. सध्या त्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या नव्या मालिकेत काम करत आहेत. एवढंच नाहीतर या मालिकेत त्यांचे पती व निळू फुले यांचे जावई ओंकार थत्ते देखील एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आज गार्गी फुले थत्ते यांनी वडिलांच्या जन्मदिनानिमित्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो समोर, नेटकरी म्हणाले, “तीन एक्के बाजी मारणार पक्के”

निळू फुले यांची मुलगी गार्गी यांनी इन्स्टाग्रामवर निळू फुलेंचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. तू जिथे असशील तिथे खूप खूप प्रेम…” गार्गी यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत निळू भाऊंना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – जीवनात भेडसावणाऱ्या समस्या अन्…; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचं ‘असं’ आहे स्वरुप, निलेश साबळे म्हणाले…

दरम्यान, गार्गी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर चांगलीच गाजली होती. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि हिंदी मालिकांमध्ये झळकल्या होत्या. ‘स्टार प्रवाह’वरील ‘शुभविवाह’ मालिकेत देखील त्यांनी काम केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gargi phule thatte shares special post for father nilu phule on him birth anniversary pps