गश्मीर महाजनी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. गश्मीर हा ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. त्याने ‘देऊळबंद’ सारख्या दमदार मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रवींद्र महाजनी यांचं निधन झाल्यावर मध्यंतरी अभिनेता चांगलाच चर्चेत आला होता. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर ‘आस्क गॅश’ हे प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

हेही वाचा : “धर्माच्या नावावर भडकवणारे…”, जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी किरण मानेंची संतप्त पोस्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण…”

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोशल मीडियावर घेतलेल्या प्रश्न उत्तरांच्या सेशनमध्ये चाहत्यांनी गश्मीरला वेगवेगळे प्रश्न विचारले होते. एका युजरने, “सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत तुमचं मत काय?” असा प्रश्न त्याला विचारला होता. याला गश्मीरने “जे अजूनतरी माझं क्षेत्र नाही आणि ज्यातलं आता तरी मला सखोल ज्ञान नाही, त्यावर मी भाष्य करु इच्छित नाही” असं उत्तर दिलं.

हेही वाचा : गेल्या २० वर्षांपासून संजय दत्त शोधतोय अमीषा पटेलसाठी जोडीदार; म्हणाला, “तुझ्या लग्नात…”

गश्मीरला दुसऱ्या एका युजरने, “गश्मीर हे नाव खूप अनोखं आहे…कोणी ठेवले? आई, बाबा की आजी आजोबा?” असा प्रश्न विचारला होता. यावर माझं नाव “गुरुजींनी ठेवले” असा खुलासा गश्मीर महाजनीने केला आहे.

हेही वाचा : “आडनाव बदलायचा प्रश्नच नाही”, जेव्हा गौतमी पाटीलच्या वडिलांनी टीका करणाऱ्यांना दिलं होतं सडेतोड उत्तर

दरम्यान, गश्मीरने सरसेनापती हंबीरराव, देऊळबंद, कॅरी ऑन मराठा अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. लवकरच अभिनेता एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader