मराठी अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत असतो. त्याच्या आईचं नाव माधवी महाजनी आहे. तो आईला कोणत्या नावाने हाक मारतो, याचा खुलासा त्याने केला आहे. तसेच त्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे. गश्मीर आईला आई म्हणत नाही तर अम्मी म्हणतो.

“दुसरी आई बनून तिने…”, वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठ्या बहिणीबद्दल बोलला गश्मीर महाजनी

रविवारी गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी बहिणीबद्दल बोलताना त्याने आईचा उल्लेख अम्मी असा केला होता. त्यानंतर त्याला आईला अम्मी म्हणण्यामागचं कारण विचारण्यात आलं, त्याचं उत्तर गश्मीरने दिलं.

gashmeer mahajani post for sister
गश्मीर महाजनीने आईचा अम्मी असा उल्लेख केला ती स्टोरी

तुम्ही तुमच्या आईला अम्मी का म्हणता, असा प्रश्न त्याला एका चाहत्याने विचारला. त्याचं उत्तर देताना गश्मीरने कारण सांगितलं. “माझे वडील त्यांच्या आईला याच नावाने हाक मारायचे, खूप लहान असताना ऐकले होते, तेव्हापासून हे नाव तोंडात बसले,” असं गश्मीर म्हणाला.

gashmeer mahajani calls ammi to mother
आईला अम्मी का म्हणतो, यामागचं गश्मीरने सांगितलेलं कारण

दरम्यान, गश्मीरने यावेळी अनेक इतर प्रश्नांची उत्तरंही दिली. मोठ्या बहिणीबाबतही त्याने सांगितलं. मोठ्या बहिणीने आपला दुसरी आई म्हणून सांभाळ केल्याचं गश्मीर म्हणाला.

Story img Loader