मराठी सिनेसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी यांचे जुलै महिन्यात निधन झाले. ते पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये एकटे राहत होते. तर, त्यांची पत्नी तसेच मुलगा गश्मीर महाजनी व त्याचे कुटुंब मुंबईत राहायचे. रवींद्र महाजनी हे बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र महाजनी घरात एकटेच होते आणि घर आतून बंद होतं. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी उशीरा कळली. दार ठोठावूनही त्यांनी उघडलं नाही. तसेच घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. त्यानंतर घरमालकाने व शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर लोकांनी गश्मीरवर प्रचंड टीका केली. एवढा लोकप्रिय अभिनेता असूनही वडिलांचा म्हातारपणात सांभाळ केला नाही, असं म्हटलं गेलं. गश्मीर मुंबहून तिथे पोहोचेपर्यंत पाच-सहा तास लागले. त्या काळात नेमकं काय घडलं? याबाबत तिथे हजर असलेला गश्मीरचा मित्र श्रीकर पित्रे याने इतक्या महिन्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा

अभिनेता श्रीकर पित्रे व गश्मीर खूप जुने मित्र आहेत. रवींद्र महाजनी दार उघडत नसल्याचं कळताच श्रीकर तिथे पोहोचला होता. त्यानंतर तिथे काय घडलं होतं, याबाबत त्याने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. श्रीकर म्हणाला, “गश्मीर माझा शाळेपासूनचा मित्र आहे. एकेदिवशी संध्याकाळी त्याचा फोन आला. ‘बाबा तळेगावला आहेत आणि दार उघडत नाहीयेत. तू जाऊन बघशील का’, असं तो म्हणाला. मी म्हटलं काय झालं, तो म्हणाला, ‘अरे कधी कधी त्यांना खूप झोप लागते, ते दार उघडत नाहीत. मला घरमालकाचा फोन आला होता की ते दार उघडत नाहीयेत’. मी त्याला जातो असं सांगितलं. नक्की काय घडलं असेल, असा विचार मी त्यावेळी केला नव्हता.”

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

पुढे श्रीकर म्हणाला, “मी माझा मित्र अक्षय साळुंकेला घेऊन तळेगावला निघालो. गश्मीरचा पाच वाजता मला फोन आला होता, मी सहा वाजता तिथे पोहोचलो. तिथे गेल्यावर खाली पोलीस होते. ते पाहून काहीतरी गडबड आहे, असं मला वाटतं. मी गश्मीरला फोन करून ताबडतोब निघायला सांगितलं. तो म्हटला की तो आधीच निघाला आहे. कधी कधी काय होतं की आपल्या मनात विचार येतात, पण ते आपल्याला स्वीकारता येत नाही. आपण खोटी आशा बाळगतो की असं काही झालं नसेल. कारण काकांना सवय होती की ते गाढ झोपल्यावर तुम्ही शेजारी ढोल बडवला तरी ते उठत नसत. त्यांचं वय पण झालं होतं, त्यामुळे कदाचित झोप लागली असेल आम्हाला वाटलं. तसेच गश्मीर मुंबईहून निघाला होता.”

रवींद्र महाजनींचा मृत्यू कशामुळे झाला? लेक गश्मीरने केला खुलासा; म्हणाला, “डॉक्टरांनी सांगितलं की…”

श्रीकरने रवींद्र महाजनींच्या घराखाली पोहोचल्यावरची परिस्थिती सांगितली. “मराठी इंडस्ट्रीतील पहिला हँडसम हिरो अशी रवीकाकांची प्रतिमा आहे. तीच आठवण कायम राहावी, असं वाटतं. मी पोहोचलो तिकडे पोलीस होते. दरवाजा मी स्वतः उघडला. गश्मीर येईपर्यंत तिथे सगळं मी व अक्षयने मिळून पाहिलं आणि सुरळीत आणण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत संबंधितांचे नातेवाईक येत नाहीत, तोपर्यंत पोलीस दरवाजा तोडू शकत नाहीत. पोलिसांनी मला विचारलं की तुम्ही नातेवाईक आहात का? मी ओघाच्या भरात हो बोललो. पण इथे रक्ताचे नातेवाईक लागतात, ही कायदेशीर बाब मला तेव्हा माहीत नव्हती. दरम्यान, मी हो म्हटल्यावर घरमालकांची परवानगी असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला.”

“माझे वडील परफेक्ट नव्हते,” वडील रवींद्र महाजनींशी असलेल्या नात्याबद्दल गश्मीरचं वक्तव्य; म्हणाला, “आमच्यातील संबंध…”

दरवाजा तोडल्यानंतर काय पाहिलं, याबाबत श्रीकर म्हणाला, “मी आतमध्ये काय पाहिलं याबाबत बोलायची इच्छा नाहीये. कारण ते सांगितल्याने कोणाला फरक पडेल किंवा काही होईल असं मला वाटत नाही. कशाला उगाच एका स्टारची प्रतिमा मलीन करायची. खरं तर तिथे वेड-वाकडं काही नव्हतं. रवीकाका गेले ही खूप दुःखद व वाईट घटना होती. त्यांच्या मुलाला मुंबईहून यायला जो वेळ लागला, त्या वेळेत त्याच्यावर काय बेतलं असेल त्याचा विचार करा. तो तिथून एकटा कार चालवत येत होता. मलाच त्याची काळजी वाटत होती. अशा परिस्थितीत आपल्याला अंदाज असतो की काय घडलंय, पण ते आपण मानायला तयार नसतो कारण आपण ते पाहिलेलं नसतं. त्या काळात पोलिसांच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करणं, रुग्णवाहिका बोलावणं आम्ही करत होतो. पण नंतर पोलिसांनी सांगितलं की रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय आम्ही पुढची वैद्यकीय कारवाई करू शकत नाही. मी त्यांना गश्मीर येतोय असं सांगितलं. ते म्हणाले गश्मीर आल्यावर पुढची कारवाई करू. तोवर रात्र झाली होती, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं ठरवलं.”

आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”

पुढे श्रीकर म्हणाला, “घटनास्थळी गश्मीर आला नाही, कारण आम्ही मृतदेह तिथून तळेगावच्या रुग्णालयात नेला होता. पोलिसांनी पुढची प्रकिया दुसऱ्या दिवशी करायचं ठरवल्याने आम्ही गश्मीरला तिकडेच थांबायला सांगितलं. आम्ही त्याला वाटेत भेटलो तो म्हणाला, ‘मला थोडा वेळ द्या सगळं प्रोसेस करायला, कारण मला काहीच सुचत नाहीये’. मग परत आम्ही पुण्याला गेलो, तिथेच थांबलो व दुसऱ्या दिवशी सकाळी तळेगावच्या रुग्णालयात गेलो आणि पुढच्या गोष्टी घडल्या,” असं श्रीकरने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani friend shrikar pitre talks about ravindra mahajani death hrc