ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलै २०२३ रोजी निधन झालं. ते पुणे जिल्ह्यातील आंबी गावात फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल मुलगा गश्मीरलाही माहीत नव्हतं, त्याला पोलिसांनी कळवलं होतं. त्यामुळे गश्मीरवर प्रचंड टीका झाली होती. या टीकेला गश्मीरने सडेतोड उत्तर दिलं होतं.
कोण आहे रवींद्र महाजनींची मुलगी? गश्मीरने शेअर केलेले बहिणीचे फोटो पाहिलेत का?
“अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो. आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच”, अशी पोस्ट गश्मीर महाजनीने वडिलांच्या निधनानंतर चार दिवसांनी केली होती.
दरम्यान, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरच्या काही पोस्ट व्हायरल होत आहे. त्या पोस्ट त्याच्या आई, पत्नी व बहिणीबद्दल होत्या. मात्र वडिलांबाबत कोणताही पोस्ट नव्हती. अशील एक पोस्ट त्याने महिला दिनानिमित्त शेअर केली होती. ज्यामध्ये
“गश्मीर माधवी महाजनी”
“गश्मीर रश्मी महाजनी”
“गश्मीर गौरी महाजनी”
डॉक्युमेंट्सवर कोणतंही नाव असलं तरी मनात आणि मनातून कायम हीच नावं असतील. मी माझ्या आयुष्यात त्यांना रोज सेलिब्रेट करतो, आज ते हायलाइट करण्याची आणखी एक संधी आहे,” असं तो म्हणाला होता. यासोबत त्याने आई, बहीण व पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले होते.
दरम्यान, दिवंगत रवींद्र महाजनी यांच्यापश्चात त्यांच्या पत्नी माधवी महाजनी, मुलगा गश्मीर महाजनी, मुलगी रश्मी महाजनी, सून गौरी महाजनी व नातू असा परिवार आहे.