ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं दीड महिन्यापूर्वी निधन झालं. ते त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते, कुटुंबीय सोबत नव्हते, मुलगा गश्मीरही त्यांच्याबरोबर नव्हता, यावरून त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं. आता गश्मीरने मुलाखत दिली आणि त्याची बाजू मांडली. यावेळी त्याने वडिलांचं कर्ज फेडलं होतं, त्याबाबतचा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र महाजनींचा मृत्यू कशामुळे झाला? लेक गश्मीरने केला खुलासा; म्हणाला, “डॉक्टरांनी सांगितलं की…”

‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर म्हणाला, “मी १५ वर्षांचा होतो, माझी दहावी झाली होती आणि त्यावेळी कळलं की त्यांच्यावर (वडिलांवर) कर्ज आहे. त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. घर आईच्या नावाने होतं, ते म्हणाले की आता तुम्ही तुमचं बघा. मी १५ वर्षांचा आणि सोबत एकटीच आई. बँकेच्या रिकव्हरी डिपार्टमेंटची लोकं पाहून भीती वाटायची. ते सगळे एकदम घरी आले, घर सील करणार, नोटीस लावणार असं ते म्हणू लागले. आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हाता-पाया पडून सांगितलं की बाबा नसले तरी आम्ही कर्ज फेडू. जर तुम्ही घर जप्त केलं तर आम्ही जाणार कुठे, आम्ही कर्ज फेडू शकणार नाही. मग बँकेने आम्हाला हप्ते ठरवून दिले.”

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

पुढे तो म्हणाला, “मी रात्री जाऊन रस्त्यावर पोस्टर लावायचो. १५-१६ वर्षांचा मुलगा रात्री पोस्टर्स लावतोय, हे पाहून पोलिसांनी पडकलं तर, अशी काळजी आईला वाटायची. मग ती येऊन रस्त्यावर थांबायची. सोबत वयस्कर बाई आहे म्हटल्यावर तुला प्रॉब्लेम येणार नाही, असं ती म्हणायची. इथून मी सुरुवात केली, नंतर इव्हेंट्स मिळवले, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. डान्सची संस्था सुरू केली. पण मला कॉर्पोरेट इव्हेंट्समधून पैसा मिळाला. त्याची कर्ज फेडण्यात मदत झाली.”

“माझे वडील परफेक्ट नव्हते,” वडील रवींद्र महाजनींशी असलेल्या नात्याबद्दल गश्मीरचं वक्तव्य; म्हणाला, “आमच्यातील संबंध…”

आपण तब्बल सहा वर्षे पैसा कमवून वडिलांचं कर्ज फेडल्याचं गश्मीर सांगतो. “मी वयाची १५ ते २१ कर्ज फेडत होतो. कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर मी आईला म्हणालो होतो की आता पुढच्या इव्हेंटची मी वाट पाहतोय कारण सहा वर्षात पहिल्यांदा मी कमावलेला पैसा कुणालाच द्यायचा नाही. सहा वर्षे मी कमावलेले पैसे फक्त बघायचो आणि कर्ज फेडण्यासाठी देऊन द्यायचो. आम्ही मान मोडून काम केलं. आता माझ्याकडे BMW आहे, मोठा फ्लॅट आहे तर बापामुळेच झालं असणार असं लोक बोलतात. पण माझ्याकडे जे आहे ते मी खूप मेहनत करून कमावलं आहे. आजही मी मेहनत करतो. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेत हे कमावलं आहे,” असं गश्मीर म्हणाला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani paid father ravindra mahajani debt by doing dance and events hrc