अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. इतकंच नाही तर तो इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देत असतो. गश्मीरने बुधवारी चाहत्यांबरोबर संवाद साधला, यावेळी त्याला राजकारणाबद्दल चाहत्यांनी विचारलं, त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

गश्मीरने बुधवारी इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं. त्यामध्ये एक चाहता म्हणाला, “सर तुम्ही बोलता जबरदस्त, राजकारणात प्रवेश करा. एक अभ्यासपूर्ण नेता मिळेल, तुमचं काय मत आहे यावर.” गश्मीर चाहत्याला उत्तर देत म्हणाला, “आत्ता तरी नाही, मला बोलायचे आहे ते माझ्या चित्रपटातून आणि मुलाखतीतून बोलीन, पुढचं पुढे बघू.”

लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”

gashmeer mahajani about politics 1
गश्मीर महाजनीची पोस्ट

याच सेशनमध्ये पुन्हा एका चाहत्याने राजकारणाचा उल्लेख केला. ‘तुला राजकारण आवडतं का?’ असं विचारल्यावर गश्मीर म्हणाला, “राजकारण रंजक आहे, मला राजकारण पाहण्याची आणि त्याबद्दल वाचण्याची सवय आहे. मी अनेक ठिकाणी जातो आणि गोष्टी एक्सप्लोर करतो.”

gashmeer mahajani about politics 2
गश्मीर महाजनी पोस्ट

दरम्यान, गश्मीरला राजकारणाची आवड असली तरी राजकारणात जवळच्या काळात नक्कीच दिसणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं आहे. चित्रपट आणि मुलाखतींमधून व्यक्त होईन. पुढचं पुढे बघू, असं त्याने राजकारणात येण्याबाबत म्हटलंय.