IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ६ गडी राखून पराभूत केलं. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४३ षटकात पूर्ण केलं. अनेक मराठी सेलिब्रिटीची या मॅचबद्दल पोस्ट करत आहेत. अशातच या अंतिम सामन्याबद्दल अभिनेता गश्मीर महाजनीने केलेली पोस्ट चर्चेत आहे. त्याने बिग बींचा उल्लेख करत स्टोरी टाकली आहे.

विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड भिडले होते. या सामन्यात भारताने ७० धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक्सवर पोस्ट करत “जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा आपण जिंकतो,” असं म्हटलं होतं. त्याबद्दलच गश्मीरने पोस्ट केली आहे.

Sachin Pilgaonkar
सचिन पिळगांवकर पत्नी सुप्रिया यांच्यासह करतायत भूतानची सफर; शेअर केले नयनरम्य फोटो
Maharashtra Assembly Election 2024 Tejaswini Pandit Post for raj thackeray
“महाराष्ट्र हरलास तू…”, विधानसभेच्या निकालानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट;…
Maharashtra vidhansabha Results 2024 Marathi Actors Post
“जो हिंदू हित की बात करेगा…”, निवडणुकीच्या निकालांवर प्रसाद ओकचं वक्तव्य; अनेक मराठी कलाकार झाले व्यक्त
amruta khanvilkar birthday and age
किती वर्षांची झाली ‘चंद्रा’? ‘ढेर सारा प्यार’ म्हणत पती हिमांशूने दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला…
Smita Tambe
“जिजा १५ वर्षे…”, मराठी अभिनेत्रीने मतदान केल्यानंतर सांगितला लेकीचा खास किस्सा; म्हणाली, “मला पेनाची शाई…”
gautami patil share video with alka kubal sai tamhankar and shiv thakare
Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार, ‘त्या’ व्हिडीओमुळे रंगली चर्चा
Deepti Lele
“मी ट्रेनमध्ये बसले होते, शेजारची मुलगी…”, अभिनेत्रीने सांगितला किस्सा; म्हणाली, “मला लाज वाटते सांगायला…”
no alt text set
‘या’ मराठी चित्रपटासाठी तीन दिग्गज गायकांनी पहिल्यांदाच एकत्र केलं पार्श्वगायन; सिनेमा पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

“बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,” अशी गमतीशीर स्टोरी गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यासोबत त्याने दोन इमोजीदेखील पोस्ट केले आहेत.

gashmeer mahajani post on india vs aus world cup final
गश्मीर महाजनी स्टोरी

गश्मीरने तीन तासांपूर्वी लेक व्योमचा एक फोटो शेअर करत ‘गो इंडिया गो’ अशी स्टोरी टाकली होती. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने जिंकून भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने २४१ धावांचं आव्हान ४ गडी गमावून पूर्ण केलं आणि भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.