IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ६ गडी राखून पराभूत केलं. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४३ षटकात पूर्ण केलं. अनेक मराठी सेलिब्रिटीची या मॅचबद्दल पोस्ट करत आहेत. अशातच या अंतिम सामन्याबद्दल अभिनेता गश्मीर महाजनीने केलेली पोस्ट चर्चेत आहे. त्याने बिग बींचा उल्लेख करत स्टोरी टाकली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड भिडले होते. या सामन्यात भारताने ७० धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक्सवर पोस्ट करत “जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा आपण जिंकतो,” असं म्हटलं होतं. त्याबद्दलच गश्मीरने पोस्ट केली आहे.

“बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,” अशी गमतीशीर स्टोरी गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यासोबत त्याने दोन इमोजीदेखील पोस्ट केले आहेत.

गश्मीर महाजनी स्टोरी

गश्मीरने तीन तासांपूर्वी लेक व्योमचा एक फोटो शेअर करत ‘गो इंडिया गो’ अशी स्टोरी टाकली होती. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने जिंकून भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने २४१ धावांचं आव्हान ४ गडी गमावून पूर्ण केलं आणि भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani post amitabh bachchan secretly watched india vs australia final match hrc