अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. बऱ्याचदा चाहते त्याला वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्याच्या चित्रपटांबद्दल प्रश्न विचारतात, या सर्व प्रश्नांची तो मोकळेपणाने उत्तरं देतो. रविवारी (१० सप्टेंबर रोजी) एका चाहत्याने त्याची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली. त्यावर गश्मीर काय म्हणाला? पाहुयात.
“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा
गश्मीरने रविवारी इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ सेशन ठेवलं. यावेळी त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. अनेक चाहत्यांना रिप्लाय दिले. यावेळी एका चाहत्याने ‘सर तुमच्याही जिवनातला संघर्ष काहिसा छत्रपती संभाजी महाराजांसारखा आहे,’ असं म्हटलं. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने उत्तर दिलं. “तुम्ही खूप मोठी तुलना करत आहात, माझ्यात त्यांच्या नखाचीही सर नाही,” असं गश्मीर चाहत्याला म्हणाला.
दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने कामातून ब्रेक घेतला आहे. पण, त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना नवी अपडेट दिली होती. “पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …” असं कॅप्शन देत गश्मीरने एक व्हिडीओ शेअर केला होता.
हा व्हिडीओ त्याच्या वेगवेगळ्या फोटोंचा कोलाज करून बनविण्यात आला आहे. गश्मीरने व्हिडीओ शेअर केला, पण चित्रपटाचं नाव काय असेल किंवा तो कोणती भूमिका साकारणार याबद्दल माहिती दिली नव्हती.