लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा त्याच्या अप्रतिम अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. गश्मीर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात राहतो. आता त्याने चाहत्याच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मराठी सिनेसृष्टीविषयी विधान केलं आहे.
गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘आस्क गॅश’ सेशन ठेवलं होतं. त्या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. ‘मराठी इंडस्ट्री दाक्षिणात्य इंडस्ट्रीसारखी यशस्वी होऊ शकते का?’ असा प्रश्न एका चाहत्याने गश्मीरला विचारला. यार गश्मीर म्हणाला, “नक्कीच. आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो. हा पॅटर्न तोडला पाहिजे.”
Video: मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दणक्यात साजरा झाला आलिया भट्टचा वाढदिवस, अंबानी कुटुंबाने लावली हजेरी

दरम्यान, गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो गेल्या काही महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वडिलांच्या निधनानंतर त्याने काही महिने ब्रेक घेतला होता, मग त्याने ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा केली होती. चाहते गश्मीरच्या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.