ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला दोन आठवडे उलटले आहेत. १५ जुलै रोजी ते पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या निधनाबद्दल कुणालाच माहिती नव्हती. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीलाही पोलिसांनी कळवलं होतं. त्यानंतर तो त्याठिकाणी आला होता.
Video: “…हे समजायची कुवत नाही समोरच्यांची”, शरद पोंक्षे यांचे वक्तव्य चर्चेत
वडिलांच्या निधनाला १५ दिवस झाले आहेत. तेव्हापासून गश्मीर सोशल मीडियावर फार सक्रिय नाही. वडिलांच्या निधनानंतर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी त्याने एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यानंतर रविवारी (३० जुलै रोजी) त्याने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी अ क्वेश्चन’ हे सेशन ठेवलं होतं. त्यात त्याने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली.
एका चाहत्याने गश्मीरला विचारलं की ‘असे काही शब्द जे तू तुझ्या वडिलांना सांगू शकत नाही,’ त्यावर गश्मीरने उत्तर दिलं. “जे मी माझ्या वडिलांना सांगू शकत नाही, ते तुम्हाला का सांगू?” असं गश्मीर म्हणाला.
दरम्यान, या कठीण प्रसंगातून कुटुंब सावरत असल्याचं गश्मीरने सांगितलं. तसेच ट्रोलिंग करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचंही तो म्हणाला. यावेळी चाहत्यांनी आपल्याला तुझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हणत गश्मीरला पाठिंबाही दिला.