ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील अपार्टमेंटमध्ये आढळला होता. त्यांच्या निधनाचं कारण समोर आलं नव्हतं. ते एकटे राहत होते, त्यामुळे दोन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा व पत्नीवर टीका होत होती. आता त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीरने वडिलांच्या निधनाचं कारण ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

“त्यांचं निधन कार्डियाक अरेस्टने झालं होतं, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तिथे असता तरी काहीच करू शकला नसता,” असं गश्मीर महाजनीने सांगितलं. गेली २०-२५ वर्षे ते एकटेच राहत होते. आधी ते मुंबईला येऊन आमच्याबरोबर राहायचे, पण मागच्या साडेतीन वर्षांपासून त्यांनी सर्वांशी संपर्क कमी केला होता, असंही गश्मीरने नमूद केलं.

“माझे वडील परफेक्ट नव्हते,” वडील रवींद्र महाजनींशी असलेल्या नात्याबद्दल गश्मीरचं वक्तव्य; म्हणाला, “आमच्यातील संबंध…”

त्यांनी ब्लॉक केल्याने आम्ही इतरांकडून त्यांच्याबद्दल माहिती काढत होतो. ते आईचा किंवा माझा, माझ्या पत्नीचा फोन उचलत नव्हते, असं गश्मीर म्हणाला. “खरंतर आमचं नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची, तेव्हा ते यायचे. जेव्हा त्यांना एकटं राहू वाटायचं, तेव्हा ते निघून जायचे. माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले होते. ते मूडी होते आणि त्यांना एकटं राहायला आवडायचं. त्यांना त्यांची कामं इतरांनी केलेली त्यांना आवडत नसे. त्यांच्याजवळ आम्ही केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आम्ही, आमचे जवळचे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मित्रांसह लोकांशी मर्यादित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली होती,” असं गश्मीरने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani reveals ravindra mahajani died due to cardiac arrest hrc