गश्मीर महाजनी हा लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी सिनेमांसह हिंदी मालिकेतही काम केलं आहे. तसेच त्याने झलक दिखला जा सारख्या शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता. गश्मीर उत्तम नट असण्याबरोबरच उत्तम डान्सरही आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गश्मीर अनेकदा इन्स्टाग्रामवर चाहत्यांना प्रश्न विचारायची संधी देतो आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरंही देत असतो. यात तो त्याचे आगामी प्रकल्प, अभिनयापासून ते कुटुंबाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. गश्मीरने १६ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ सेशन ठेवलं होतं. यावेळी एका चाहत्याने त्याला त्याच्या पत्नीबद्दल प्रश्न विचारला.

‘मला वाटतं तू कधीच तुझ्या पत्नीचं कौतुक करत नाहीस आणि तिचा उल्लेखही करत नाहीस.’ यावर गश्मीर म्हणाला, “काही गोष्टी सार्वजनिकपणे जाहीर करण्याची गरज नसते. त्या खासगीत शेअर करायच्या असतात आणि खूप कमी लोक ही गोष्ट समजतात,” असं उत्तर गश्मीरने त्याला दिलं.

गश्मीर महाजनीने चाहत्याला दिलेलं उत्तर

दरम्यान, गश्मीरच्या पत्नीचे नाव गौरी देशमुख आहे. गौरी व गश्मीरचं लग्न ९ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालं होतं. या जोडप्याला व्योम नावाचा मुलगा आहे. गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर कामातून ब्रेक घेतला होता. सध्या तो त्याच्या आगामी प्रकल्पांवर काम करत असून लवकरच तो पडद्यावर झळकणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani reveals why he doesnot appreciate wife gauri deshmukh publicly hrc