गश्मीर महाजनी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी मालिकांमध्येही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्याचा मराठीसह हिंदीतही मोठा चाहतावर्ग आहे.
गश्मीर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. तसेच तो इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देतो. मागच्या काही काळापासून दर रविवारी तो इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवतो. तिथे तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तर देतो.
रविवारी (८ ऑक्टोबर रोजी) त्याने हे सेशल ठेवलं होतं. यावेळी त्याला एका चाहत्याने प्रश्न विचारला. ‘तू इतका विनम्र कसा आहेस?’ असा प्रश्न चाहत्याने विचारल्यावर गश्मीर म्हणाला, “बघा ना, इतका विनम्र असूनही लोक म्हणतात की मी उद्धट आहे.”
दरम्यान, गश्मीर मागच्या दोन महिन्यांपासून ब्रेकवर आहे. वडील रवींद्र महाजनींच्या निधनानंतर त्याने कुटुंबासाठी ब्रेक घेतला होता. आता तो लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने स्वतःच याबाबत माहिती दिली होती. पण त्याने त्या चित्रपटाबद्दल अधिक खुलासा केलेला नाही.