मराठीतील आघाडीचा अभिनेता गश्मीर महाजनी व मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता तसेच निर्माते प्रवीण विठ्ठल तरडे या दोघांची खूप घट्ट मैत्री आहे. इतकंच नाही तर दोघांनी एकत्र कामही केलं आहे. प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गश्मीरने केली होती. तसेच गश्मीरच्या ‘देऊळ बंद’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईला ‘या’ नावाने हाक मारतो गश्मीर महाजनी; म्हणाला, “माझे वडील त्यांच्या आईला…”

गश्मीर अनेकदा त्याच्या प्रवीण तरडेंच्या मैत्रीबद्दल बोलत असतो. गश्मीरच्या वडिलांचं निधन झालं तेव्हाही प्रवीण तरडे मित्रासाठी तिथे होते. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील काही मोजक्या लोकांनी फोन करून आधार दिला होता, असं गश्मीरने इन्स्टाग्रामवर सांगितलं. त्यावेळी त्याने प्रवीण तरडे, रितेश देशमुख, मृण्मयी देशपांडे यांनी नावं घेतली होती. आता पुन्हा एकदा त्याने प्रवीण तरडेंचं कौतुक केलं आहे.

“दुसरी आई बनून तिने…”, वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठ्या बहिणीबद्दल बोलला गश्मीर महाजनी

‘प्रवीण तरडेंबद्दल काही शब्द बोल,’ असं एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना गश्मीर म्हणाला, “तो सर्वोत्तम आहे. एक प्रोफेशनल म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्याइतकं चांगलं मला कोणीच ओळखत नाही.”

गश्मीर महाजनीची पोस्ट

दोघांची मैत्री कशी झाली?

गश्मीरने कमी वयात नृत्य करून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. उत्तम डान्स करणाऱ्या गश्मीरची पुण्यात असताना प्रवीण तरडेंशी ओळख झाली. त्याला लेखन आणि दिग्दर्शनातही रस होता. तेव्हा प्रवीण नाटकं, एकांकिका लिहायचे आणि दिग्दर्शन करायचे. त्यांनी लिहिलेल्या काही नाटकांमध्ये गश्मीरने अभिनय केला होता. एकदा गश्मीरच्या आईने त्याच्या करिअरबाबत प्रवीण तरडेंकडे चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर प्रवीण यांनी ‘देऊळ बंद’ सिनेमातील राघव शास्त्रीची भूमिका गश्मीरसाठी लिहिली होती. ‘देऊळ बंद’चे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडेंनीच केलं होतं. नंतर दोघांनी ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये एकत्र काम केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani says pravin tarde is the best hrc