मराठी व हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकणारा अभिनेता गश्मीर महाजनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. गश्मीर दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी १५ जून रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्याचं कारण म्हणजे गश्मीर आणि त्याच्या वडिलांचं नातं. गश्मीरचे वडील त्याच्यापासून दूर पुण्यात एकटे राहायचे. त्यांनी गश्मीरला कॉल्स, मेसेजवरून ब्लॉकदेखील केलं होतं.

हेही वाचा… “…तुम्ही हुमा कुरेशीच्या पाया पडत होता”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “मला भरून आलं…”

गश्मीरनं याआधी त्याचा मित्र सौमित्रच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत देऊन, अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. आता पुन्हा एकदा त्या विषयावर त्यानं खुलासा केला आहे. वडिलांच्या निधनानंतर गश्मीर खूप हवालदिल झाला होता.

गश्मीर महाजनीनं ‘गलाटा इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत गश्मीर म्हणाला, “माझ्या आयुष्यात असे काही क्षण आहेत, जे सांगायलादेखील मला कठीण वाटतात. मला आठवतंय की, वडिलांच्या निधनाच्या दोन आठवड्यांनंतर आणि आई आजारी पडल्यानंतर एका रात्री माझं आणि तिचं खूप मोठं भांडण झालं होतं. एकदा तर मला माझं आयुष्य संपवावंसं वाटलं होतं.”

हेही वाचा… “माझ्या आईने त्याला खूप झापलं होतं”, ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ फेम रोहित राऊतला ओरडली होती जुईलीची आई; गायकाने सांगितला सासूबाईंचा किस्सा

गश्मीर पुढे म्हणाला, “मी एका रात्री टेरेसवर गेलो होतो आणि माझ्या मनात माझं आयुष्य संपवण्याचा विचार आला होता. कारण- मला ते सगळं सहन होत नव्हतं. पण, अचानक माझ्या डोक्यात असा विचार आला की, मला एक मुलगा आहे; जो पाच वर्षांचा आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. नशिबानं माझी पत्नी आणि मुलगा तिथे माझ्या बाजूला पुण्यात होते. जर ते नसते, तर मी माझं आयुष्य नक्कीच संपवलं असतं. मी त्या रात्रीचा विचार करून अजूनही खूप घाबरतो की, जर मी दुसरा निर्णय घेतला असता, तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं.”

हेही वाचा… “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, गौरव मोरेचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, या मुलाखतीमध्ये गश्मीरनं अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. त्याशिवाय त्याला या सगळ्या प्रकरणामुळे झालेला त्रास आणि समाजमाध्यमांवरील लोकांच्या कमेंट्स यांवरही गश्मीरनं मनमोकळेपणानं भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani wanted to end his life after his father death dvr