मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी वडिलांच्या निधनानंतर मागचे काही दिवस मोठ्या पडद्यावरून दूर होता, पण आता तो लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने स्वतःच याबद्दल माहिती दिली आहे. तो एका ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण तो कोणती भूमिका साकरणार आहे, याबद्दल त्याने अद्याप काहीच सांगितलेलं नाही.

“दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

गश्मीरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. “पुन्हा एकदा तोच प्रवास… लवकरच …” असं कॅप्शन देत गश्मीरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या वेगवेगळ्या फोटोंचा कोलाज करून बनविण्यात आला आहे. गश्मीरने व्हिडीओ शेअर केलाय, पण चित्रपटाचं नाव काय असेल किंवा तो कोणती भूमिका साकारणार याबद्दल माहिती दिलेली नाही.

गश्मीरने ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका कोणती असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. गश्मीरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी चाहत्यांनी त्याला शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेस का? की त्यांच्या मावळ्यांच्या भूमिकेत दिसशील असं विचारलं.

“बँकेचे लोक पाहून भीती वाटायची,” गश्मीर महाजनीने सांगितली आठवण; म्हणाला, “मी रात्री रस्त्यावर पोस्टर…”

चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गश्मीर म्हणाला, “त्या काळातील मोठा साहसपट करत आहे एवढंच. बाकी माहिती योग्य वेळी देईन. आधी कधीच झाला नाही, असा हा चित्रपट असेल आणि त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,” असं गश्मीरने सांगितलं.

Story img Loader