मराठी बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याचा शोध या भयपटातून घेण्यात आला आहे. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्याने प्रेक्षकांची या चित्रपटाला पसंती मिळाली. याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
गौरव मोरेने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ‘अल्याड पल्याड’चा सीक्वेल अर्थात ‘अल्याड पल्याड २’ ची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली आहे.
‘अल्याड पल्याड’ हा भटपट असून चित्रपटाला एक विनोदाची सुद्धा किनार होती. भय अन् विनोद यांची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. “आमचा पहिला चित्रपट लोकांना इतका आवडलाय आणि त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे… हे ऐकून आम्हाला खरंच खूप छान वाटलं”, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत.
हेही वाचा : सुबोध भावेच्या नवीन मालिकेत कोण असेल खलनायिका, वर्षभराने छोट्या पडद्यावर परतणार, कोण आहे ‘ती’ अभिनेत्री?
‘अल्याड पल्याड’ चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस. के. पाटील यांचं आहे. नवनवीन विषय घेऊन येण्याची मराठी कलाविश्वाची क्षमता पाहूनच आम्ही मराठी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर सांगतात. ‘अल्याड पल्याड’चा सीक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांत चित्रपटाला पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला. २०० हून अधिक चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता ‘अल्याड पल्याड’चा दुसरा भाग २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.