मराठी कलाविश्वात मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या बहिणींची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. चित्रपटसृष्टीत देशपांडे बहिणींची नेहमीच चर्चा असते. मालिका, चित्रपट, सीरिज या विविध माध्यमांतून या बहिणी प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. एकमेकींना त्रास देणारे, कौतुक करणारे असे अनेक व्हिडीओ त्या इन्स्टाग्रामवर शेअर करतात. नुकताच गौतमीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “तुला घट्ट मिठी आणि…”, ‘रॉकी और रानी’ पाहिल्यावर सई ताम्हणकर भारावली, क्षिती जोगसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

गौतमीने शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. यामध्ये गौतमी आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजेच मृण्मयीला त्रास देताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत गौतमी म्हणते, “ताई, मला यापुढे त्रास देताना हजारवेळा विचार करत जा अन्यथा…” पुढे व्हिडीओमध्ये झोपमोड केली म्हणून मृण्मयी चिडून रडताना दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार गौतमीने तिच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

हेही वाचा : “अंगात १०२ ताप अन्…”, कार्तिक आर्यनने सांगितला लंडनमधील शूटिंगचा किस्सा, म्हणाला, “३-४ गोळ्या घेऊन थंड पाण्यात…”

मृण्मयी आणि गौतमीच्या भांडणाचा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेक कलाकरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने गौतमीला टॅग करत, “सेलिब्रिटी बहिणींची भांडणं होतात का?” असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना गौतमी लिहिते, “कोणत्याही बहिणी भांडतातचं…” तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर अमृता खानविलकर, अन्विता फलटणकर, रेशम या अभिनेत्रींनी कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “प्रचंड नकारात्मकता…”, ‘इंद्रजीत’ फेम अभिनेत्याने ‘आदिपुरुष’च्या अपयशाबद्दल मांडले स्पष्ट मत; म्हणाला, “माझे नातेवाईक…”

दरम्यान, मृण्मयी-गौतमीच्या या मजेशीर सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा तुफान वर्षाव होत आहे. अवघ्या दोन दिवसात गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओला तब्बल १० लाख व्ह्यूज आले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami deshpande shared funny fight video with sister mrunmayi deshpande netizens asked question sva 00