मराठी कलाविश्वात देशपांडे सिस्टर्सची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत काही वर्षांपूर्वी गौतमी देशपांडेने कलाविश्वात पदार्पण केलं. तिच्या ‘माझा होशील ना’ या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. काही महिन्यांपूर्वीच गौतमीने स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली.

मृण्मयी व गौतमी या दोन्ही बहिणी एकमेकींना कायम खंबीरपणे साथ देताना दिसतात. याशिवाय त्यांच्यामध्ये घडणारे मजेशीर किस्से दोघीही सोशल मीडियावर शेअर करत असतात. गौतमीने लाडक्या ताईबद्दलचा असाच एक किस्सा आलिया भट्टचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत सांगितला आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

हेही वाचा : सासूबाई मृणाल कुलकर्णी, तर शिवानी रांगोळेच्या आईला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केले खास फोटो

आलिया भट्टने काही महिन्यांपूर्वी नणंदबाई करीना कपूर खानबरोबर ‘कॉफी विथ करण’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी दोघींनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी आलिया म्हणाली होती, “सैफने एके दिवशी मला विचारलं, ‘आलिया तू आणि तुझी बहीण सतत फोनवर बोलता का?’ यावर मी म्हणाले होते ‘हो अर्थात’ तेव्हा त्याने बेबो आणि लोलो सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगत बसतात असं मला सांगितलं. त्यामुळे मी सुद्धा तशीच वागते का? हे त्याला जाणून घ्यायचं होतं.” आलियाचा हाच व्हिडीओ गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुची पत्नी आहे मराठी; गुजराती कुटुंबात गेल्यावर सासूबाईंनी दिली खंबीर साथ; श्रद्धाने सांगितला किस्सा

गौतमी हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “माझ्या बहिणीबरोबर असं कधीच घडत नाही. कारण तिला फोन केल्यावर ती विचारते काही अर्जंट नाहीये ना? जरा वेळाने मी तुला कॉल करते आणि असं सांगून माझी बहीण मला कधीच कॉलबॅक करत नाही.” अशी पोस्ट शेअर करत तिने मृण्मयीला टॅग केलं आहे.

gautami
गौतमी देशपांडेची पोस्ट

दरम्यान, गौतमी देशपांडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावर दमदार भूमिका साकारल्यानंतर सध्या ती ‘गालिब’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader