Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा विवाहसोहळा पुण्यात पार पडला. या दोघांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील कलाकार व दोघांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नसोहळ्याचे असंख्य फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून गौतमीच्या लग्नासाठी देशपांडेंच्या घरी जोरदार तयारी सुरू होती. गौतमी ही लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमासाठी मृण्मयीने विशेष तयारी केली होती. हळदी आणि संगीत सोहळ्यात अभिनेत्रीने खास डान्स देखील केला होता.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?

हेही वाचा : Video : आलिया भट्ट-रणबीर कपूरकडून चाहत्यांना मिळालं ख्रिसमिस गिफ्ट! अखेर दाखवला लेक राहाचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल

गौतमी-स्वानंदच्या लग्नातील बरेच फोटो आता व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोमध्ये मृण्मयी स्वानंदचा कान पिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. मृण्मयीप्रमाणे गौतमीचे इतर भाऊ सुद्धा या कानपिळीच्या विधीला उपस्थित होते.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये उपेंद्र लिमयेंची भूमिका असेल का? खुलासा करत म्हणाले, “माझं संदीपशी परवाच…”

दरम्यान, मराठी कलाविश्वात मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या बहिणींची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. चित्रपटसृष्टीत देशपांडे बहिणींची नेहमीच चर्चा असते. मालिका, चित्रपट, सीरिज या विविध माध्यमांतून या बहिणी प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. एकमेकींना त्रास देणारे, कौतुक करणारे असे अनेक व्हिडीओ त्या इन्स्टाग्रामवर शेअर करतात.

Story img Loader