मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रसाद-अमृता, मुग्धा-प्रथमेश, सुरुची-पियुष या सेलिब्रिटी जोड्यांपाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. छोट्या पडद्यावरील मालिका ‘माझा होशील ना’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. याशिवाय ती अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यासंदर्भात तिची मोठी बहीण मृण्मयी देशपांडेने देखील काही खास पोस्ट शेअर केल्या होत्या. यामुळेच गौतमी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मृण्मयीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये देशपांडे कुटुंबीय एकत्र डान्सची तयारी करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर तिने एकत्र कौटुंबिक स्नेहभोजनाचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. परंतु, मृण्मयीने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
लग्नमंडपातील सजावटीचा फोटो शेअर करत मृण्मयीने या फोटोला “#SwaG #Lafdi” असे हॅशटॅग दिले आहेत. #SwaG हॅशटॅगमुळे गौतमी देशपांडे अभिनेता-इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्न करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी देखील त्यांचे कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते.
![mrunmayi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/12/deshpande-1.jpg?w=830)
हेही वाचा : “अन् मातोश्रीशी संबंध संपला…”, नाना पाटेकरांनी सांगितली जुनी आठवण; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाले…
याशिवाय मृण्मयीने लाडक्या बहिणीबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला “काय वाटतंय??” असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी “गौतमी लग्न करतेस का?”, “ताई तुझं लग्न केव्हा असेल?”, “वाह लग्न…” अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, गौतमीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती गालिब या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.